मोटोरोला रेजरच्या फोनला मागणी पाहून ग्लोबल लाँच आणि प्री – ऑर्डर पुढे ढकलण्यात आली होती. या फोनला जबरदस्त मागणी मिळत आहे, असा कंपनीना दावा केला होता. त्यामुळे कंपनीला सप्लाय वाढवणे भाग पडले होते. ज्या ग्राहकांनी हा फोन बुकिंग केला त्या लोकांना वेळीच फोन मिळावा यासाठी कंपनीने या फोनची लाँचिंग पुढे ढकलली होती. मोटोरोला रेजरची यूएसमध्ये २६ डिसेंबर पासून फोनची प्री ऑर्डर सुरू करण्यात येणार आहे. मोटोरोलाचा हा एक फोल्डेबल फोन आहे. कंपनीच्या जुन्या फ्लिप फोन डिझाइनच्या आधारावर तो आहे. यात ६.२ इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि २.१ इंचाचा G-OLED देण्यात आला आहे. फोनमधील स्क्रीन ६.२ इंचाचा आणि फोन फोल्ड झाल्यानंतर बाहेरचा २.७ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा आउटर डिस्प्ले यूजर्सला नोटिफिकेशन्सची माहिती देतो. फोनचा फिंगर प्रिंट सेन्सर आउटर पॅनलवर देण्यात आला आहे.
या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एसओएस प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. डिस्प्लेसोबत फोनमध्ये कॅमेरे देण्यात आले आहेत. १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा इंटरनल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ९ पाय आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. हा फोन सिमकार्डला सपोर्ट करतो. यात २,५१० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार आहे. तसेच या फोनची किंमत किती असू शकते याची माहिती अद्याप समोर आली नाही.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times