नवी दिल्लीः जानेवारी महिन्यात एस २१ स्मार्टफोन्स सोबत सीरीजच्या लाँचिंगच्या घोषणेसोबतच कंपनी आणखी एका इव्हेंटची तयारी करीत आहे. सॅमसंगने ६ जानेवारी २०२१ साठी एका इवेंटला शेड्यूल केले आहे. या इवेंटमध्ये कंपनी नवीन टीव्ही मॉडल्स आणि डिस्प्ले टेक्नोलॉजी समोर आणणार आहे.

वाचाः

इनवाइटनुसार, ” इवेंट मध्ये स्क्रीनसाठी नवीन व्हिजन शोकेस केले जाणार आहे. इनवाइटमध्ये हेही सांगितले की, नवीन प्रोडक्ट्स आणि टेक्नोलॉजी पाहायला मिळणार आहे. या फोटोत वेगवेगळे मॉनिटर्स, टीव्ही, टेबलेट्स आणि स्मार्टफोन्स पाहायला मिळू शकतात. या वर्षी CES 2020 दरम्यान कंपनीने ८८ इंचाचा आणि १५० इंचाचा मायक्रो एलईडी मॉडल्स सोबत QLED 8K TV ला शोकेस केले होते. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, कंपनी २०२१ मध्ये कंपनी QLED 8K TVs समोर आणणार आहे.

वाचाः

तसेच ५५ इंचाचा, ६५ इंचाचा, ७६ इंचाचा आणि ८५ इंचाच्या स्क्रीन साइजमध्ये काही क्वॉन्टम मिनी एलईडी टीव्ही मॉडलमध्ये सुद्धा लाँचिंग केली जावू शकते. २०२१ मध्ये अॅपल सुद्धा मिनी एलईडी डिस्प्ले सोबत टेबलेट्स आणि लॅपटॉप्स आणण्याची तयारी करीत आहे. अॅपल अद्यापही अॅपलमध्ये सॅमसंगने बनवलेल्या पॅनल्सचाच वापर करीत आहे. सॅमसंगच्या
The First Look 2021 इवेंटची सुरुवाती ६ जानेवारी रोजी साडे नऊच्या सुमारास सुरू होईल. तसेच या इव्हेंटला samsung.com वर लाइव्ह पाहता येवू शकते. ६ जानेवारी आधी याची सविस्तर माहिती कंपनीकडून देण्यात येईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here