वाचाः
नुकताच एक टीजर व्हिडिओ समोर आला होता. ज्यात ची झलक पाहायला मिळाली होती. Xiaomi Mi 11 ला चीनमध्ये पुढील आठवड्यात लाँच केले जाणार आहे. यासोबतच Mi 11 Pro ला ही लाँच केले जाणार आहे. Xiaomi Mi 11 ची किंमत विबोवर लीक झाली आहे. याला द फोन टॉक्सने स्पॉट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनच्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत ४५०० चिनी युआन म्हणजेच जवळपास ५० हजार ७०० रुपये आहे. 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत ४८०० चिनी युआन म्हणजेच ५४ हजार रुपये. तर याच्या टॉप व्हेरियंट 12GB + 256GB ची किंमत ५२०० चिनी युआन म्हणजेच ५८ हजार ६०० रुपये किंमत आहे.
वाचाः
दुसरीकडे Mi 10 च्या बेस मॉडल 8GB + 128GB वेरिएंटला ३९९९ चिनी युआन म्हणजेच ४५ हजार रुपयात लाँच करण्यात आले होते. शाओमीने सध्या अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे लाँचिंगनंतर या सर्व फोनची खरी माहिती उघड होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक विबो पोस्टवरून ही माहिती समोर आली होती की, Mi 11 ची किंमत ३९९९ चिनी युआन ठेवली जावू शकते. Mi 10 च्या 128GB व्हेरियंटाला भारतात ४९ हजार ९९९ रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनला ५४ हजार ९९९ रुयपांत लाँच करण्यात आले होते. शाओमी चीनमध्ये Mi 11 ला २८ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times