वाचाः
जानेवारीत लाँच होवू शकतो नवीन फोन
या दरम्यान, ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, लावा पुढील वर्षी ५ हजार ते २० हजार रुपयांच्या किंमतीत चार नवीन डिव्हाईस लाँच करू शकते. तसेच ९१ मोबाइल्सच्या सूत्रांनी सांगितले की, लावाचे हे स्मार्टफोन ७ जानेवारी रोजी लाँच केले जावू शकते.
वाचाः
लावाने लाँच केला Be U स्मार्टफोन
Lava BeU ला भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनीने लेटेस्ट बजेट स्मार्टफोन म्हणून लाँच केले आहे. हा नवीन फोन खास महिलासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ज्यात क्रिस्टल स्टड डेकोरेशन आणि फ्लोरल स्पीकर मेश देण्यात आले आहे. लावाचा बीयू याशिवाय प्रीलोडेड सेफ्टी अॅप सोबत येतो. लावा बीयूची किंमत भारतात ६ हजार ८८८ रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी करता येवू शकतो. या फोनला रोज पिंक कलर ऑप्शन सोबत Lava International वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे.
वाचाः
Lava BeU चे खास वैशिष्ट्ये
लावाच्या चार फोनच्या फीचर्सची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, कंपनीने आपल्या अधिकृत Lava BeU ची माहिती कन्फर्म केली आहे. या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) फोन अँड्रॉयड गो एडिशन वर काम करणार आहे. या फोनमध्ये ६.०८ इंचाचा एचडी प्लस (720×1,560 पिक्सल) डिस्प्ले सोबत 19.5:9 आस्पेक्ट रेशियो मिळणार आहे. या फोनच्या डिस्प्ले मध्ये २.५डी कर्व्ड ग्लास आणि वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात येणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times