नवी दिल्लीः वनप्लस ९ सीरीजच्या युजर्संना खूप मोठी उत्सूकता आहे. पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या सीरीजची काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. वनप्लसच्या या अपकमिंग सीरीजवरून लेटेस्ट माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, कंपनी (वनप्लस ९ आणि वनप्लस ९ प्रो) सोबत वनप्लस ९ लाईट सुद्धा लाँच करणार आहे.

वाचाः

स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळणार
अँड्रॉयड सेंट्रलच्या एका रिपोर्टनुसार, वनप्लस ९ आणि वनप्लस ९ प्रो मध्ये कंपनी लेटेस्ट ५ एनएम चिपसेटचा स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देणार आहे. परंतु, वनप्लस ९ लाइटमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देणार आहे. वनप्लस ९ लाइट मध्ये या प्रोसेसरला देवून कंपनी फोनची किंमत कमी ठेवू शकते. सध्या वनप्लस ८ टी ची सुरुवातीची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. तसेच वनप्लस नॉर्डची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ७ टी ची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

वनप्लस ७ टी होवू शकतो डिसकंटिन्यू
एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, काही महिन्यात वनप्लस ७ टी ला कंपनी डिसकंटिन्यू करू शकते. वनप्लस ९ लाइट त्या युजर्ससाठी उपलब्ध राहिल जे वनप्लस नॉर्ड आणि वनप्लस ८ टीच्या मध्ये एखादा डिव्हाईस घेवू शकेल.

वाचाः

120Hz रिफ्रेश रेट आणि फास्ट चार्जिंग
वनप्लस ९ लाइटमध्ये वनप्लस ८ टी चे अनेक फीचर्स पाहायला मिळू शकतात. यात स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर सोबत 90Hz किंवा 120Hz चे रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोन वनप्लस ८ टी च्या कॅमेऱ्या वैशिष्ट्यासोबत येण्याची शक्यता आहे. वनप्लस ९ लाइटमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. वनप्लस ९ लाइटच्या फीचर्स संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here