नवी दिल्लीः मध्ये खूप आधीपासून मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणण्याचे काम केले जात आहे. या वर्षी आलेल्या अनेक रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे. कंपनी या येणाऱ्या फीचरला अनेक सुधारणा करीत आहे. आता पुन्हा एकदा नवीन रिपोर्ट्समध्ये व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाइस फीचरवरून नवीन माहिती समोर आली आहे.

वाचाः

व्हॉट्सअॅप संबंधी माहिती ट्रॅक करणारा टेक ब्लॉग WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार, व्हॉट्सअॅप आता हे टेस्टिंग करीत आहे. या फीचरच्या ऑन झाल्यानंतर कोणत्या प्रकारे कॉन्फिगर असणार आहे. टिप्स्टरच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपवर हे टेस्टिंग केले जात आहे. वेगवेगळ्या डिव्हाईसेजवर एकाच अकाउंटसाठी कॉलिंग फीचर कशाप्रकारे काम करणार आहे. यावरून संकेत मिळत आहेत की, व्हॉट्सअॅप या येणाऱ्या फीचरवरून गंभीर आहे. त्यामुळे हे फीचर लवकर रोलआउट केले जावू शकते.

वाचाः

परंतु, टिप्स्टरच्या म्हणण्यानुसार, आता या फीचरची रिलीज डेटवरून कोणताही माहिती समोर आली नाही.

वाचाः

याधी मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर संबंधी अनेक माहिती समोर आलेली आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, युजर्स एकासोबत चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर एकाच व्हॉट्सअॅप अकाउंट चालवू शकतील. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वेबचा वापर करताना युजर्सला प्रायमरी डिव्हाइसवर अॅक्टिव इंटरनेट कनेक्शनची गरज पडणार नाही.

वाचाः

आधीच्या रिपोर्ट्समध्ये हेही सांगितले होते की, अॅपमध्ये Linked Devices सेक्शन अंतर्गत मल्टी डिव्हाइस सपोर्ट मिळणार आहे. युजर्स ‘Link a New Device option’ वर टॅप करून नवीन डिव्हाइसला अॅड करू शकतील. तसेच याशिवाय, युजर्सकडे सर्व कनेक्टेड डिव्हाईसेजच्या एका लिस्ट सोबत फीचरला इनेबल आणि डिसेबल करून एक टॉगल बटन सुद्धा राहिल.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here