नवी दिल्लीः सॅमसंगच्या (Samsung) सुपर प्रीमियम टीव्हीवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. सॅमसंग आपल्या ‘8K फेस्टिवल’ अंतर्गत च्या प्रीमियम रेंजवर मेगा डिल्स देत आहे. या ऑफर पीरियड दरम्यान सॅमसंगच्या सुपर प्रीमियम QLED 8K टीव्हीवर ३ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅकच्या स्पेशल किंमत ऑफर सर्व प्रमुख कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सवर ३१ डिसेंबर पर्यंत ही ऑफर उपलब्ध असणार आहे.

वाचाः

२० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक
६५ इंचाचा QLED 8K मॉडल्स वर ७५ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. तर ७५ इंचाच्या मॉडल्सवर २ लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ८२ इंचाच्या QLED 8K TV मॉडल्सवर ३ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, या प्रीमियम टीव्हीवर २० टक्के जास्तीत जास्त कॅशबॅक दिला जातो.

वाचाः

Samsung ने भारतात आपला पहिला QLED 8K TV २०१९ मध्ये ९८ इंचाचा, ८२ इंचाचा, ७५ इंचाचा आणि ६५ इंचाचा लाँच केला होता. या टीव्हीचे प्रमुखे फीचर्स मध्ये ८ के रिझॉल्यूशन 8K AI अपस्केलिंग, क्वॉन्टम प्रोसेसर 8K आणि क्वॉन्टम HDR चा समावेश आहे. टीव्ही एम्बियंट मोड सोबत येते. जे युजर्सला टीव्ही फ्रेममध्ये इंटरॅक्टिव बॅकग्राउंड अप्लाय करण्याची संधी देते. यावर्षीच्या सुरुवातीला सॅमसंगने आपली 2020 QLED 8K TV लाइन आणली होती. ज्यात ४३ इंचा पासून ७५ इंचापर्यंत साईज उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

किंमत ४.९९ लाखांपासून
६५ इंचाच्या मॉडलची किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. ७५ इंचाच्या टीव्हीची किंमत ९.९९ लाख रुपये आहे. ८२ इंचाच्या मॉडलची किंमत १४.२९ लाख रुपयांत लाँच केले होते. तर ८५ इंचाच्या मॉडलची किंमत १५.७९ लाख रुपये आहे. या टीव्हीमध्ये अल्ट्रा-थिन फॉर्म फॅक्टर दिला आहे. ज्यात सॅमसंग Infinity Screen दिले आहे. यात ९९ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो दिले आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here