नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने २०२० मध्ये खूप सारे नवीन फीचर्स () आणले आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर केवळ पैशांची देवाण-घेवाण करू शकत नाहीत तर ऑलवेज म्यूटचा पर्याय सुद्धा तुम्हाला मिळू लागला आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०२० या वर्षात टॉप ५ फीचर्स संबंधी खास माहिती देत आहोत.

वाचाः

WhatsApp Payment
आता व्हॉट्सअॅपचा वापर पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी केला जावू शकतो. अॅपमध्ये WhatsApp Payment फीचर आले आहे. या फीचरची खूप दिवसांपासून चर्चा होती. सुरुवातीला व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधा ही एसबीआय बँक, ICICI बँक, HDFC बँक आणि Axis बँक सोबत पार्टनरशीप केली आहे. या बँकासोबत ग्राहक यूपीएय सिस्टममधून मनी ट्रान्सफर करू शकतील.

वाचाः

Dark Mode
डार्क मोड आता जवळपास सर्व मोबाइल आणि अॅप्समध्ये आले आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या डार्क मोड फीचरला यावर्षी जोडले आहे. या फीचरमुळे एक लूक बदलला जाईल. तसेच बॅटरी सुद्धा कमी खर्च होईल. डार्क मोड अॅक्टिवेट करण्यासाठी सर्वात आधी व्हॉटसअॅपच्या Settings मध्ये जावून त्यानंतर Chats मध्ये जा. थिम मध्ये जावून डार्क पर्याय निवडा.

वाचाः

Disappearing Messages
स्नॅपचॅट प्रमाणे व्हॉट्सअॅपवर हे डिसअपीयरिंग मेसेज फीचर आणले आहे. या फीचरला इनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेले मेसेज ७ दिवसांनंतर चॅटमधून ऑटोमॅटिकली डिलीट होतील.

वाचाः

WhatsApp Group Video And Voice Calls
करोना महामारी आणि लॉकडाउन ममध्ये व्हॉट्सअॅप वरून व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग फीचरचा वापर वाढला आहे. सुरुवातीला ग्रुप कॉलिंगची लिमिट केवळ ४ होती. आता ती वाढवून ८ करण्यात आली आहे.

वाचाः

Always Mute
व्हॉटसअॅपवर अनेकदा मेसेजमुळे त्रस्त व्हावे लागते. अशा बिनकामाच्या मेसेज पासून सुटका करण्यासाठी कंपनीने यावर्षी अलवेज म्यूट (Always Mute Group) फीचर आणले आहे. या फीचरच्या आधारे आता तुम्ही Mute Notification वर जावून तुम्ही 8 Hours, 1 Week, आणि Always करू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here