नवी दिल्लीः तत्काळ कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अॅप्सद्वारे माहिती चोरीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे. या घोटाळ्याचा चीनशी संबंध असल्याचे परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे मिळाल्याचे या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वाचाः

या अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व अॅप्सचा सर्व्हर हा चीनमध्ये आहे. तसेच या अॅप्सच्या माध्यमातून वापरण्यात आलेला डॅशबोर्डही चीनमध्ये आहे. विशेष म्हणजे, सीआयडीने अलीकडेच ज्या चार कंपन्यांवर छापा टाकला होता, त्यापैकी तीन संचालक हे चीनमधील रहिवासी आहेत. या घोटाळ्याचा चीनशी संबंध स्पष्ट करताना सीआयडीच्या सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक एम. डी. शरथ यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांवर येथे छापा टाकण्यात आला आहे, त्या सर्व कंपन्या या चीनमधून संचालित होत होत्या.

वाचाः

अनेक लोकांनी आपली व्यक्तिगत माहिती चोरी झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. तत्काळ कर्ज देणाऱ्या अॅप्सच्या कंपन्यांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली होती. या चोरी करण्यात आलेल्या माहितीच्या माध्यमातून आरोपी ग्राहकांना धमक्या देत आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या देत होते. महिला ग्राहकांना बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. काही प्रकरणांमध्ये तर आरोपी पीडित व्यक्तींच्या फोन बुकचा वापर करून व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून अश्लील मेसेज पाठवत असत.

वाचाः

या प्रकरणाचा चीनशी संबंध असल्याची माहिती देताना सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोरायन्क्सी टेक्नोलॉजीज प्रा. लि.चा संचालक हा चिनी कंपनी होंगहु इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिस प्रा. लि.चा देखील मालक आणि संचालक आहे. या व्यतिरिक्त मॅड एलिफन्ट ही कंपनी रमिंगटेक प्रा. लि. या कंपनीची मालकी असलेली सहाय्यक कंपनी आहे. या कंपन्यांच्या मालकांपैक एक चिनी नागरिक आहे. यानपेंग कू असे त्याचे नाव आहे.

वाचाः

या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आणखी एका बनावट कंपनीची माहिती मिळाली आहे. या कंपनीकडे जवळपास १० तत्काळ कर्ज देणारी अॅप्स असण्याची शक्यता आहे. या कंपनीवर लवकरच छापा मारण्यात येणार आहे आणि आवश्यकता असल्यास संशयितांना अटकही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन अटकेत

हैदराबाद : अॅप्सद्वारे तत्काळ कर्ज उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्धच्या कारवाई अंतर्गत तेलंगण पोलिसांनी एक पुणेस्थित कॉल सेंटर उद्ध्वस्त केले असून, तीन जणांना अटक केली आहे. यात एका चिनी महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण कर्ज घेणाऱ्यांना त्रास देत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here