नवी दिल्लीः रियलमी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नवीन वर्षाआधी जबरदस्त भेट दिली आहे. रियलमीने ची वेळ वाढवली आहे. २८ डिसेंबर रोजी संपणारा सेल आता कंपनीने ३१ डिसेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रियलमीचे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन सोबत टीव्ही सुद्धा स्वस्तात खरेदी करता येवू शकते. रियलमीच्या फोनवर ७ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. तर स्मार्ट टीव्हीवर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः

या स्मार्टफोनवर सर्वात जास्त डिस्काउंट
रियलमी डेज सेल दरम्याने Realme X50 Pro 5G स्मार्टफोन्सवर ७ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. रियलमीच्या या सेलमध्ये हा फोन केवळ ३४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. Realme X3 SuperZoom फोनवर ४ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. याची किंमत २३ हजार ९९९ रुपये झाली आहे. Realme X3 वर ३ हजारांची सूट दिली जात आहे. या सूटनंतर या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये झाली आहे.

वाचाः

या प्रसिद्ध फोनवर इतकी सूट
Realme Narzo 20 Pro सेलमध्ये १ हजार रुपयांची सूट मिळत आहे. यानंतर हा फोन १३हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. Realme 6 आणि 6i वर २ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. यानंतर याची किंमत ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. Realme days sale दरम्यान कंपनी Realme C15 आणि C15 Qualcomm Edition यासारख्या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

वाचाः

स्मार्ट टीव्हीवर इतका फायदा
Realme days sale दरम्यान स्मार्ट टीव्हीर सूट दिली जात आहे. रियलमीच्या ५५ इंचाच्या टीव्हीवर ३ हजारांची सूट मिळत आहे. यानंतर याची किंमत ३९ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत २२ हजार ९९९ रुपये झाली आहे. कंपनी यावर १ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. रियलमीच्या ३२ इंचाच्या टीव्हीवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात असून १३ हजार ९९९ रुपये किंमत झाली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here