नवी दिल्लीः विवो कंपनीने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत आणखी दोन स्मार्टफोन Vivo X60 आणि X60 Pro लाँच केले आहेत. सॅमसंगच्या प्रोसेसर सोबत येणाऱ्या या दोन स्मार्टफोनला कंपनीने सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 120Hz रिफ्रेश रेट यासारखे जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.

वाचाः

Vivo X60 आणि X60 Pro स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये
या दोन्ही स्मार्टफोनची डिझाइन विवो एक्स ५० सारखी आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये HDR10 आणि HDR10+ चा सपोर्ट मिळतो. दोन्ही फोनमध्ये केवळ स्क्रीनचा फरक आहे. विवो एक्स ६० मध्ये तुम्हाला फ्लॅट स्क्रीन पाहायला मिळू शकते. तर विवो एक्स ६० प्रोमध्ये कंपनीने ड्यूल कर्व्ड स्क्रीन दिली आहे.

वाचाः

वाचाः

विवो X60 सीरीज मध्ये सॅमसंगचा Exynos 1080 चिपसेट दिले आहे. विवो X60 १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येते. तर विवो X60 प्रो केवळ १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये आणले आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड OriginOS आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतात. फोटोग्राफीसाठी विवो एक्स ६० मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा SONY IMX598 प्राइमरी सेंसर सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. विवो एक्स ६० प्रोमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत दोन १३ मेगापिक्सलचा (एक टेलिफोटो आणि एक अल्ट्रा वाइड) कॅमेरा आणि एक ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा मिळणार आहे. विवो एक्स ६० प्रो मध्ये ऑप्टिकल झूम आणि ६० एक्स सुपर झूम सुद्धा मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

विवो X60 मध्ये 4200mAh आणि X60 प्रो मध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोनला ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. विवो X60 ची सुरुवातीची किंमत 3498 युआन (जवळपास 34,300 रुपये) आणि विवो X60 प्रो ची किंमत 4498 युआन (जवळपास 50,600 रुपये) ठेवण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here