नवी दिल्लीः स्वस्तातील आयफोन Apple खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. अॅपलच्या या आयफोनवर लिमिटेड पीरियडसाठी ६ हजार ९०० रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनला ३९ हजार ९०० रुपयांच्या किंमतीत भारतात लाँच करण्यात आले होते. परंतु, आता या ऑफर अंतर्गत हा आयफोन ३२ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

ग्राहकांनी जर ICICI बँक कार्ड सोबत शॉपिंग केल्यास १० टक्के आणि HSBC क्रेडिट कार्ड सोबत ५ टक्के सूट मिळवू शकतात. तसेच या डिव्हाइसवर १३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. ही ऑफर केवळ ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दिली जात आहे. आयफोन एसई सोबत आयफोन ११ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्सचा ए १३ प्रोसेसर या फोनमध्ये दिला आहे. सध्या बाजारात सर्वात स्वस्त आयफोन हाच आहे.

वाचाः

iPhone SE 2020 ची वैशिष्ट्ये
या आयफोनमद्ये ४.७ इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. फोन ग्लास आणि अॅल्यूमिनियम डिझाइनसोबत येतो. यात १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर ७ मेगापिक्सलचा फेस टाइम कॅमेरा दिला आहे. हा 1080पिक्सल विडियो रिकॉर्डिंग सपोर्ट करोत. या फोनमध्ये टच आयडी फीचर सुद्धा देण्यात आले आहे.

वाचाः

अॅपल आयफोन एसई मध्ये ए १३ बायोनिक चिपसेट दिला आहे. हा स्वस्तातील आयफोन IP67 सर्टिफिकेशन सोबत येतो. म्हणजेच फोनला पाण्यापासून कुठलेही नुकसान होत नाही. हा हँडसेट १ मीटर पर्यंत पाण्यात पडला तरी अर्धा तास राहिल्यास काहीही याला होत नाही. आयफोन वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. फोनमध्ये 4G VOLTE, ब्लूटूथ 5.0, वाय फाय ax, NFC आणि जीपीएस यासारखे फीचर्स सोबत येतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here