नवी दिल्लीः चा नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच साठी तयार आहे. कंपनीने आपल्या विबो चॅनेलवर या अपकमिंग फोनच्या लाँचिंगसंदर्भाद कन्फर्म केले आहे. हा फोन चीनमध्ये ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजता लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या फोनच्या BMW एडिशनचे डिझाइन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून फोनच्या रियर डिझाइनची माहिती उघड झाली आहे.

वाचाः

पोस्टर पाहिल्यानंतर दिसत आहे की, फोनला तीन रियर फेसिंग कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनच्या कॅमेरा ट्राइंगल डिझाइन दिली आहे. स्पेशल बीएमडब्ल्यू एडिशनमध्ये व्हाइट रियरसोबत ब्लॅक, रेड आणइ ब्लू स्ट्रिप दिली आहे. फोनची फ्रंट डिझाइन संबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या संबंधित काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी यात विवो एक्स ६० सीरीजचा डिस्प्ले ऑफर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये कंपनी टॉप स्टँडर्ड सेल्फी कॅमेरा होल सोबत ६.५६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले ऑफर करू शकते.

वाचाः

या फोनमध्ये स्क्रीन फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि १२९ हर्ट्जचा रिफ्रेश रेट सोबत येईल. याशिवाय, फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे. फोनचे सर्वात मोठे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी प्रोसेसर दिला जावू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यासंबंधी अद्याप काही माहिती समोर आली नाही. फोनच्या बॅटरी संबंधी सुद्धा कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या फोनमध्ये १२० फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here