वाचाः
शाओमीने काही दिवसांपूर्वी या अपकमिंग स्मार्टफोनचा टीजर जारी केला होता. तसेच आपल्या अधिकृत वेबसाइटवर याचे लँडिंग पेज लाइव्ह केले होते. या पेजवर फोनचे फीचर्स आणि खास वैशिष्ट्ये संबंधी अनेक माहिती देण्यात आली होती. परंतु, यावरून हे स्पष्ट झाले नव्हते की ही वैशिष्ट्ये Mi 10i 5G स्मार्टफोनची आहेत की अन्य दुसऱ्या स्मार्टफोनची आहेत. लँडिंग पेजच्या आधारावर म्हटले जावू शकते की, फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जावू शकतो. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये ७५० जी प्रोसेसर मिळणार आहे. कंपनी या फोनमध्ये जास्त रिफ्रेश रेटचा डिस्प्ले ऑफर करणार आहे. लँडिंग पेजवरून असा अंदाज बांधला जात आहे की, फोनमध्ये कर्व्ड सोबत सिम ट्रे दिला जावू शकतो.
वाचाः
फोनला Mi 10T Lite च्या रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच करू शकते. जर असे असेल तर फोनमध्ये 1080 पिक्सल रेजॉलूशन आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये अडाप्टिव डिस्प्लेचा सुद्धा ऑप्शन मिळू शकतो. फोनच्या रिफ्रेश रेटला युजर आपल्या गरजेप्रमाणे ३० ते १२० Hz दरम्यान सेट करू शकतात.
वाचाः
फोनला ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले जावू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळू शकते. तसेच फोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times