नवी दिल्लीः सध्या मोबाइल डेटाची गरज जास्त आहे. त्यामुळे अनेकांना जास्त डेटा देणारे प्लान पसंत पडत असतात. आज आम्ही तुम्हाला ३ जीबी डेटा मिळणाऱ्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओच्या प्रीपेड प्लानविषयी माहिती देत आहोत. हे प्लान बेस्ट आहेत. ज्यात डेटासोबत अनेक फायदे मिळतात. वोडाफोन-आयडिया सोबत रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्लानसंबंधी ही खास माहिती.

वाचाः

एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्रीपेड प्लान जबरदस्त आहे. युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यासोबतच युजर्संना नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग तसेच १०० एसएमएसची सुविधा मिळते. युजर्संना Xstream Premium चे फ्री सब्सक्रिप्शन, फ्री Hellotunes, फ्री Wynk Music सब्सक्रिप्शन सोबत एक वर्षासाठी Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स तसेच फास्टटॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक यासारखे ऑफर्स मिळतात.

वाचाः

जिओचा ४०१ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा ४०१ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. रोज ३ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग तसेच १०० फ्री एसएमएस मिळते. सोबत युजर्संना ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. सर्व जिओ अॅप्स आणि एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वोडाफोन-आयडियाचा ४४९ रुपयांचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना डबल डेटा बेनिफिट्स मिळतात. म्हणजेच युजर्संना ५६ दिवसासाठी रोज ४ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग तसेच रोज १०० फ्री एसएमएस मिळू शकतात. तसचे Movies अॅपचे फायदे मिळतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here