नवी दिल्लीः शाओमीने आज भारतात आपला बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लाँच केला आहे. याआधी कंपनीने या सीरीजमध्ये Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. Xiaomi Mi 10i मध्ये स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर तसेच सॅमसंग सेन्सरचरा १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कंपनीने आधी सांगितल्याप्रमाणे Xiaomi Mi 10i ला खास भारतीय ग्राहकांसाठी कस्टमाइज केलेले आहे. यातील आयचा अर्थ इंडिया असा होतो.

वाचाः

फोनची किंमत
Xiaomi Mi 10i च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत २० हार ९९९ रुपये ठेवली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत २१ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. फोनला देशात पॅसिफिक सनराइज, अटलांटिक ब्लू, आणि मिडनाइट ब्लॅक कलर मध्ये खरेदी करता येवू शकते. हा फोन ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध होणार आहे. तर ८ जानेवारी पासून फोनला ओपन सेल मध्ये खरेदी करता येवू शकते. अॅमेझॉन इंडिया शिवाय या फोनला कंपनीची वेबसाइट mi.com वर सुद्धा खरेदी करता येवू शकते.

वाचाः

फोनची वैशिष्ट्ये
Xiaomi Mi 10i फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस (2400 x 1080 पिक्सल) रेजॉलूशन चा डॉट डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा अडेप्टिव रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनच्या सुरक्षेसाठी फ्रंटला व बॅकला कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. शाओमीच्या या लेटेस्ट फोनमध्ये क्वॉलकॉम ७५० जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये X52 5G मॉडल आहे. जे 5G कनेक्टिविटी सपोर्ट करते. हँडसेटमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम दिला आहे. स्टोरेजसाठी ६४ जीबी आणि १२८ जीबी असे दोन पर्याय दिले आहेत.

वाचाः

फोनला पॉवर देण्यसााठी यात 4820mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जर मिळतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी (Samsung HM2) सेंसर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहेत. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here