नवी दिल्लीः ब्रॉडबँड सेक्टरमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन – नवीन प्लान आणि ऑफर आणत आहे. या यादीत आता ने यूजर्स ला २० टक्के जास्त डेटा सोबत 1000GB फ्री डेटा देण्याची ऑफर सुरू केली आहे. कंपनी १ हजार जीबी पर्यंत फ्री डेटा हा वार्षिक प्लानसोबत देत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः

७९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
कंपनीच्या या प्लानचे नाव सिल्वर प्रोमो ब्रॉडबँड प्लान आहे. जर युजर्स याला ६ महिन्यासाठी सब्सक्राईब करीत असतील तर त्यांना ६ महिन्यांसाठी १ हजार जीबी फ्री डेटा मिळेल. तसेच कंपनी या प्लानला सब्सक्राईब करणाऱ्या युजर्संना कोणताही इंस्टॉलेजशन चार्ज लावत नाही. सध्या या प्लानमध्ये युजर्सला दर महिन्याला एफयूपी लिमिट सोबत १ हजार जीबी डेटा मिळतो.

वाचाः

१०४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
हा कंपनीचा प्लॅटिनम प्रोमो प्लान आहे. यात दर महिन्याला २ हजार जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानला ६ महिन्यांसाठी सब्सक्राईब करण्यासाठी फ्री इंस्टॉलेशन सोबत १ हजार जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री दिला जातो. ६ महिन्याच्या प्लानला सब्सक्राईब केल्यानंतर ६ हजार २९४ रुपये द्यावे लागतात. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात नेटफ्लिक्स वर दर महिन्याला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

वाचाः

१३४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
एसीटी फायबरनेटचा हा डायमंड प्लान आहे. यात कंपनी ३०० Mbps च्या स्पीडने FUP लिमिट सोबत ३ टीबी डेटा ऑफर करते. या प्लानला कंपनी दोन सेमी वार्षिक पॅक सोबत ऑफर करीत आहे. पहिल्या पॅकेजमध्ये युजर्संना ६ महिन्याचे सब्सक्रिप्शनसाठी ८ हजार ९४ रुपये मोजावे लागतात. यानंतर कंपनी युजर्संना एक महिन्याचे एक्स्ट्रा सर्विस फ्री, वायफाय राउटर फ्री आणि ६ महिन्यांच्या वैधतेसोबत १ हजार जीबी डेटा देत आहे. प्लानमध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन वर ३५० रुपयांचा कॅशबॅक देते. या प्लानमध्ये दुसऱ्या पॅकेजमध्ये एक महिन्याची फ्री सर्विस सोडून बाकीचे बेनिफिट्स देत आहे.

वाचाः

२० टक्के एक्स्ट्रा डेटा ऑफर
कंपनी या युजर्संना २० टक्के एक्स्ट्रा डेटा देत आहे. जे एसीटी फायबरनेटच्या वार्षिक प्लानला सब्सक्राईब करते. याशिवाय प्लानमध्ये स्टँडर्ड १ हजार जीबी फ्री डेटा दिला जातो. जो पूर्ण सब्सक्रिप्शन पीरियडसाठी वैध आहे. ७९९ रुपयांच्या प्लानला १६ हजार १८८ रुपयांत एक वर्षासाठी सब्सक्राईब करीत असाल तर तुम्हाला २० टक्के (३३०० जीबी एक्स्ट्रा डेटा) सोबत १ हजार जीबी आणि एक्स्ट्रा डेटा दिला जातो. यासोबत कंपनी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनवर ३५० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here