वाचाः
फोनची किंमत
नेपाळमध्ये लाँच करण्यात आलेल्या Samsung Galaxy M02s स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा सेल ऑनलाइन द्वारे करण्यात येत असून या फोनला Daraz.com वरून खरेदी करता येवू शकते. या स्मार्टफोनला ब्लॅक, ब्लू, आणि रेड कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येवू शकते. भारतात सॅमसंग गॅलेक्सी एम ०२ एस स्मार्टफोनला ७ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची किंमत १० हजारांच्या जवळपास असू शकते, असे बोलले जात आहे.
वाचाः
फोनचे फीचर्स
Samsung Galaxy M02s स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित Samsung One UI ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा (720×1,560 पिक्सल) टीएफटी वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले दिला आहे. तसेच यासोबतच Adreno 506 जीपीयू आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
वाचाः
याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये आयएसओ कंट्रोल, ऑटो फ्लॅश, डिजिटल झूम, एचडीआर आणि एक्सपोजर यासारखे फीचर्स दिले आहेत. ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून १५ वॉट क्विक चार्ज सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times