नवी दिल्लीः सॅमसंग आपला नवीन सॅमसंग ला आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने आधीच माहिती दिली आहे की, या फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सीचा हा पहिला ४ जी रॅमचा स्मार्टफोन असणार आहे ज्याची किंमत १० हजारांच्या आत असणार आहे. सॅमसंग Galaxy M02s ला दोन दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

सॅमसंग Galaxy M02s साठी कंपनीची वेबसाइट आणि अॅमेझॉनवर एक मायक्रोसाइट बनवली आहे. या ठिकाणी देण्यात आलेल्या माहितीनुसार आज दुपारी १ वाजता या स्मार्टफोनला लाँच करण्यात येणार आहे. लाँच नंतर या फोनची विक्री दोन्ही प्लॅटफॉर्मवरून केली जाणार आहे. सॅमसंगने म्हटले की, Galaxy M02s बेस्ट गेमिंग, स्ट्रीमिंग ब्राउजिंग आणि फोटोग्राफी एक्सपीरियंस ऑफर करणारा आहे. तसेच सॅमसंगने आपल्या साईटवर ही सुद्धा माहिती दिली आहे की, सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनिफिनिटी व्ही डिस्प्ले, ४ जीबी रॅम आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळणार आहे.

वाचाः

या फोनला दोन दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये लाँच करण्यात आले आहे. नेपाळमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या पर्यायात या फोनला लाँच करण्यात आले आहे. नेपाळमध्ये या फोनची किंमत ९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, रेड कलर ऑप्शनमध्ये आणले आहे. नेपाळमध्ये लाँच करण्यात आलेल्या Galaxy M02s मध्ये ६.५ इंचाचा (720×1,560 पिक्सल) TFT वाटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (13MP + 2MP + 2MP), 5MP सेल्फी कॅमेरा, 15W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी दिली आहे. भारतात सुद्धा लाँच करण्यात येणाऱ्या फोनमध्ये हेच फीचर मिळण्याची शक्यता आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here