नवी दिल्लीः भारतात सध्या जवळपास प्रत्येक व्यक्ती डिजिटल पेमेंट करीत आहे. खास करून लॉकडाउननंतर डिजिटल पेमेंटमध्ये खूप मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांनी लॉकडाउन आणि करोना काळात आर्थिक अडचणीचा सामना केला आहे. त्यामुळे अनेकांना लोनची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे देशातील लिडिंग डिजिटल पेमेंट सर्विस प्लॅटफॉर्म Paytm ने एक नवीन सर्विस लाँच करण्यात आली आहे. या सर्विसचे नाव इंस्टेंट पर्सनल लोन सर्विस आहे. कंपनीची ही सर्विस लोकांपर्यंत पेटीएमची क्रेडिट सर्विस पोहोचण्यासाठी आणली आहे. कंपनीची इंस्टेंट पर्सनल लोन सर्विसचा वापर व्यक्ती वर्षभरात कधीही करू शकतो. यात व्यक्ती सुट्टीच्या दिवशी सुद्धा अर्ज करू शकतो.

Paytm इंस्टेंट पर्सनल लोन सर्विस संबंधी जाणून घ्या
Paytm ने सर्विस लॉन्च दरम्यान सांगितले की, “Paytm विना बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFC) साठी टेक्नोलॉजी आणि डिस्ट्रीब्यूशन पार्टनर आहे. यातून पगारधारक व्यक्तींना, छोट्या व्यवसाय करणाऱ्या मालकांना आणि प्रोफेशनल पर्यंत आपली सेवा पोहोचण्यास मदत मिळू शकते. कंपनीकडून या सर्विस अंतर्गत आणि बँकांकडून लोन दिले जाणार आहे. कंपनीच्या या सर्विसमुळे छोट्या शहरात आणि गावातील व्यक्तींना सशक्त बनवले जावू शकते. जे बँकेंपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना मदत मिळू शकते.

वाचाः

केवळ २ मिनिटात मिळणार लोन
पेटीएमने लोन अॅप्लिकेशन साठी पूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे. त्यामुळे फिजिकल डॉक्यूमेंटजी गरज पडणार नाही. ही सर्विस पेटीएमच्या टेक प्लॅटफ़ॉर्मवर बनवण्यात आली आहे. जी बँक आणि NBFC ला केवळ २ मिनिटात लोन अॅप्लिकेशन पूर्ण करता येवू शकते. नवीन इंस्टेंट पर्सनल लोन योजना अंतर्गत पेटीएम २ लाखांपर्यंत लोन पगार धारकांना, छोट्या व्यापाऱ्यांना आणि प्रोफेशन्सल यांना उपलब्ध करणार आहे.

वाचाः

Paytm Lending चे सीईओ भावेश गुप्ता यांनी सांगितले की, आमचे ध्येय आहे की, इंस्टेंट पर्सनल लोन सर्विसला सेल्फ अॅप्लाइंड, वैयक्तिक आणि प्रोफेशनल्स साठी सोपे बनवणे होय. तात्काळ खर्चासाठी पर्सनल लोन सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना आपले स्वप्न पूर्ण करताना कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी याची नक्कीच मदत होईल, असे ते म्हणाले.

वाचाः

पेटीएम एक भारतीय ई-कॉमर्स पेमेंट प्रणाली आहे. हे अॅप सध्या ११ भाषेत उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून मोबाइल रिचार्ज, युटिलिटी पेमेंट, प्रवास मूव्ही आणि इवेंट बुकिंग यासारखे किराणा दुकान, फळे, भाजीपाला, दुकान, रेस्टॉरंट, पार्किंग, टोलमध्ये ऑनलाइन पेमेंट करता येवू शकते. भारतात ७ मिलियनहून जास्त व्यापारी थेट आपल्या बँक अकाउंटवरून पेमेंट करतात किंवा रिसीव करतात. तर Paytm QR कोड द्वारे पेमेंट केले जाते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here