नवी दिल्लीः जर तुम्हाला विवोचा फोन खरेदी करायचा असेल तर सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर कार्निवल सेल सुरू करण्यात आला आहे. या सेलला ६ जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. हा सेल ९ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये विवोच्या अनेक फोनवर ५ हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये Vivo V20 Pro आणि Vivo V20 2021 सोबत Vivo VS1 Pro आणि Vivo Y51 यासारख्या फोनचा समावेश आहे.

वाचाः

अॅमेझॉनवर ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V20 Pro 5G फोनला २९ हजार ९९० रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. ग्राहक जर जुना फोन एक्सचेंज करीत असेल तर यावर अतिरिक्त २ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. याचप्रमाणे या सेलमध्ये V20 2021 ची विक्री २४ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत केली जाते. ग्राहक जुन्या फोनला एक्सचेंज करीत असेल तर त्यांना २ हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे.

वाचाः

३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला V20 SE अॅमेझॉनवर २० हजार ९९० रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. ग्राहकांना या फोनवर जुन्या फोनवर एक्सचेंज केल्यास अतिरिक्त २ हजार रुपये मिळू शकतात. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेऱ्याचा V19 स्मार्टफोन २४ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहकांना जुना फोन एक्सचेंज केल्यास ५ हजारांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. याचप्रमाणे ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला S1 Pro ई-कॉमर्स साइटवर १८ हजार ९९० रुपयांत उपलब्ध आहे. या फोनवर एक्सचेंज अंतर्गत ३ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाते.

वाचाः

या सेलमध्ये Y51 (8GB) १७ हजार ९९० रुपयांत लिस्टेड आहे. यावर एक्सचेंज अंतर्गत १ हजार रुपयांची अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. याचप्रमाणे Y20 सीरीजवर १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ११ हजार ४९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. या सेलमध्ये 5000mAh बॅटरीच्या Y50 वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत २ हजारांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या फोनला अॅमेझॉनवर १६ हजार ४९० रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच १३ हजार रुपये किंमतीच्या Y30 वर एक्सचेंज अंतर्क १५०० रुपयांची अतिरिक्त सूट दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here