वाचाः
३९८ रुपयांचा बीएसएनएल वाउचर
KeralaTelecom च्या एका रिपोर्टनुसार, ३९८ रुपयांचा प्रीपेड वाउचर मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग मिनिट्स मिळतात. या पॅकची वैधता ३० दिवसांची आहे. तसेच पॅकचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ३० दिवसांपर्यंत एफयूपी लिमिटची चिंता नाही. युजर्स अनलिमिटेड डाउनलोड्स आणि अपलोड्स करू शकतील.
वाचाः
व्हाइस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स शिवाय युजर्स रोज १०० एसएमएस फ्री पाठवू शकतात. रोमिंग आणि दिल्ली व मुंबई MTNL नेटवर्कवर सुद्धा अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स मिळणार आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रीमियम नंबर्स, इंटरनॅशनल नंबर्स, इन नंबर्सवर आउटगोइंग कॉल किंवा एसएमएस साठी स्टँडर्ड चार्ज द्यावा लागणार आहे. ३९८ रुपयांचा वाउचरचा फायदा बीएसएनएल युजर्स १० जानेवारी २०२१ पासून खरेदी करू शकतील. हा प्लान देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये रिचार्जसाठी उपलब्ध आहे.
वाचाः
कोणतीही दुसरी टेलिकॉम कंपनी कोणत्याही प्लानमध्ये ट्रूली अनलिमिटेड डेटा ऑफर करीत नाही. परंतु, बीएसएनएल आता ३ जी वरून ४ जीवर शिफ्ट होत आहे. तर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्या ४ जी सर्विस ऑफर करतात. म्हणजेच बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग थोड्या स्पीडने कमी मिळणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times