नवी दिल्लीः जगभरात आयफोनला इतकी पसंती का मिळतेय?, आयफोनची किंमत कमी का होत नाही?, इतर फोनच्या तुलनेत आयफोनची किंमत नेहमी जास्त का असते?, सर्वात सुरक्षित फोन म्हणून आयफोनकडे का पाहिले जाते?, या सर्व प्रश्नाचे उत्तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आयफोनला १२००० फुटांच्या उंचीवरून खाली फेकण्यात आले. पण, तरीही या आयफोनला काहीच झाले नाही. बंद पडला नाही. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

वाचाः

एका रिपोर्टनुसार, स्कायडायवर कोडी मॅड्रो सोबत ही घटना अलॉय एरिजोना मध्ये घडली आहे. स्कायडायवरचे मित्र सर्व काही रेकॉर्ड करीत होते. व्हिडिओ शूट करताना त्याच्या मित्राने खिशातून काही तरी पडताना पाहिले. iPhone खाली पडल्याची माहिती ३१ वर्षीय स्कायड्रायवर कोडी मॅड्रोला नव्हती. तो खाली उतरला त्यावेळी त्याचा आयफोन त्याच्याकडे नव्हता. त्यानंतर त्याने ‘Find my iphone’ अॅपच्या मदतीने फोनला शोधले. त्यानंतर स्कायड्रायवरने आपल्या आयफोनची क्लिप इंस्टाग्रामवर शेयर केली.

वाचाः

क्लिपमध्ये पाहिले जावू शकते की, फोनची स्क्रीन खूप खराब झाली आहे. कोडीने सांगितले की, ज्यावेळी त्याला त्याच्या मित्राने सांगितले की, काही तरी पडत आहे. त्यावेळी मला भीती वाटली. परंतु, सुदैवाने कोडी एकदम सुरक्षित होता. कोडीने सांगितले की, पडल्यानंतर दोन आठवडे काम करीत होता. फोनची स्क्रीन पूर्ण फुटली होती. परंतु, फोन व्यवस्थित काम करीत होता. १२ हजार फुटांवरून पडूनही फोन व्यवस्थित काम करीत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोडीने या क्षणाची व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेयर केली आहे. ज्यावेळी फोन खिशातून पडत आहे. फोन पडल्यानंतर स्क्रीन फुटली परंतु, फोनच्या साईडला काहीच झाले नाही. फोन व्यवस्थित सुरू होता. एक अॅप सुद्धा ओपन केला. त्याच्या या पोस्टवर मिक्स प्रतिक्रीया उमटल्या आहेत. काही लोकांना शॉक लागला आहे. तर काही लोक म्हणाले ही क्लिप अॅपलला पाठवली तर कंपनी त्याला नवीन फोन देईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here