नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo)ने नुकताच आपला ओप्पो एफ१५ () फोन भारतात लाँच केला होता. भारतात या फोनची सरळ टक्कर या फोनसोबत होणार आहे. रेडमी नोट ८ प्रोची किंमत ओप्पो एफ१५ पेक्षा कमी आहे. जर या दोन फोनपैकी तुम्हाला कोणता फोन घ्यायचाय याविषयी काही संशय असेल तर या दोन्ही फोनची खास वैशिष्ट्ये पाहायला हवीत.

रेडमी नोट ८ प्रो ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ओप्पो एफ१५ या फोनची किंमत १९ हजार ९९० रुयपे इतकी आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. ओप्पो एफ१५ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी अमोलेड स्क्रीन दिला आहे. रेडमी नोट ८ प्रोमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी एचडीआर डिस्प्ले दिला आहे. ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन एफ१५ मध्ये मीडिया टेक हेलिओ पी७० प्रोसेसरवर चालतो. तर ओप्पोचा फोन अँड्रॉयड ९ पाय व्ही९.० वर बेस्ड् करल ओएस ६.१ वर चालतो. रेडमी नोट ८ प्रोत ड्युअल सीम (नॅनो) सपोर्ट आहे.

ओप्पोच्या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा दोन कॅमेरे दिले आहेत. ओप्पोमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमी नोटमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. रेडमी नोट ८ प्रो मध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ओप्पोची बॅटरी क्षमता ४,००० एमएएचची दिली आहे. तर रेडमी फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here