वाचाः
BSNL फ्री सिम कार्ड ऑफर
बीएसएनएलच्या माहितीनुसार, पहिल्यांदा १०० रुपयांहून जास्त रिचार्ज करण्याऱ्या ग्राहकांना फ्री (२० रुपये किंमतीचा) सिम कार्ड मिळणार आहे. ही ऑफर ८ जानेवारी ते १६ जानेवारी पर्यंत आहे. म्हणजेच या रिचार्जसाठी एकमेव अट म्हणजे पहिला रिचार्ज १०० रुपयांहून जास्त असायला हवा.
वाचाः
बीएसएनएच्या सब्सक्राइबर्स १०८ रुपयांचे एफआरसी प्लानमध्ये २५० मिनिट प्रतिदिन, १ जीबी डेटा रोज आणि ५०० एसएमएस रोज मिळू शकतात. या प्लानची वैधता ४५ दिवसांची आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्या ९७ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर एफआरसी ऑफर करते. परंतु, बीएसएनएलच्या १०८ रुपयांच्या एफआरसी सारखे फायदे मिळत नाही.
वाचाः
याशिवाय, बीएसएनएलने रिपब्लिक डे २०२१ ऑफरची सुद्धा घोषणा केली आहे. टेलिकॉम कंपनीने १९९९ रुपयांच्या प्लानची वैधता २१ दिवसांनी वाढवली आहे. तर २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता सुद्धा ७२ दिवसांनी वाढवली आहे. १९९९ रुपयांच्या बीएसएनएलच्या प्लानची वैधता आता ३८६ दिवस तर २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ४३७ दिवसांची आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times