नवी दिल्लीः गेल्या वर्षी फेब्रुवारीत Google आणि WhatsApp ची जोरदार चर्चा सुरू झाली होती. ज्यावेळी काही पब्लिक ग्रुग गुगल सर्च रिझल्टमध्ये दिसायला सुरू झाले होते. या व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटकडून मेंबर इन्फोला गुगल सर्चमध्ये पाहिले गेले होते. परंतु, ही समस्या दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा एकदा काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाइल गुगल सर्च मध्ये दिसत आहे. Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी ही माहिती दिली.

वाचाः

यावेळी युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाइल पिक्चर सुद्धा गुगल सर्च मध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. म्हणजेच जर कोणाकडे व्हॉट्सअॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगल वर याला सर्च करून जॉइन करू शकतात.

वाचाः

रिपोर्टमध्ये हेही सांगितले आहे की, यूजर्स लिंक सोबत ग्रुप जॉइन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगर सर्च करून पाहिल्या जावू शकतात. सध्या ही माहिती उघड झाली नाही की, अखेर व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे. परंतु, जवळपास १५०० ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करीत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत.

वाचाः

एक्सपर्टने सांगितले की, फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टेंट मेसेंजर अॅप chat.whatsapp.com सबडोमेन साठी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. कंपन्या सर्च क्रॉलर्सला कॉन्टेन्ट इंडेक्स करण्यापासून रोखण्यासाठी robots.txt चा वापर करते.

वाचाः

युजर प्रोफाइल पाहिल्यास गुगलने युजर्सचा प्रायव्हेट अकाउंट दिसणे सुरू केले आहे. यात युजर्सची प्रोफाइल इमेज, त्याच्या नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपचच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाइल पाहू शकतात. आलेल्या बातम्यांनुसार, जवळपास ५००० प्रोफाइल आता सार्वजनिक आहे. राजसाहरिया यांच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप या ठिकाणी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. सध्या व्हॉट्सअॅप आणि गुगलने यासंबंधी कोणतीही माहिती दिली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here