नवी दिल्लीः जगभरात दोन सॉफ्टवेयर लोकप्रिय आहेत. ज्यात एक अँड्रॉयड आणि दुसरे आयओएस. सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून अँड्रॉयड, आयओएसच्या तुलनेत थोडे कमी आहे. कारण, यावर हॅकिंगचा धोका आहे. अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर गुगल प्ले स्टोरवरून आपण अनेकदा असे अॅप्स डाउनलोड करतो, ज्यांची आपल्याला पुरेसी माहिती नसते.

वाचाः

हे अॅप कुठून येतात. किती वेळेसाठी आले आहेत. याचा आपल्याला किती फायदा होणार आहे. त्यावेळी आपण अशा अॅप्सला इन्स्टॉल करण्यासाठी परमिशन देतो. त्यात आपले लोकेशन, फोटोज आणि व्हिडिओच्या अॅक्सेसचे परमिशन मागितले जाते. यामुळे या अॅपला आपल्या मोबाइलचे बरेच कंट्रोल मिळू शकते. त्यामुळे आपल्या फोनवर कोणत्या अॅपची नजर आहे, हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही.

वाचाः

कोणकोणते अॅप्स तुमच्यावर नजर ठेवून आहेत, जाणून घ्या
>> सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यायला हवे की, तुम्ही कोणकोणत्या अॅप्सला परवानगी दिली आहे. यासाठी हे स्टेप्स फॉलो करा.

>> यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. खालच्या बाजुला स्क्रॉल करा. या ठिकाणी तुम्हाला अॅप्सचा पर्याय मिळेल. यावर टॅप करा.

>> आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सर्व अॅप्स या ठिकाणी दिसतील. आता तुम्ही कोणत्याही अॅपवर टॅप कराल त्यावेळी तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. यातील एक परमिशन असेल.

>> या ठिकाणी तुम्हाला माहिती होईल की, जे अॅप तुम्ही सिलेक्ट केले आहेत. त्या अॅपला कोण-कोणती परमिशन दिली आहे. जर या परमिशनला रद्द करायचे असेल तर त्यावर क्लिक करा. तसेच Deny वर टॅप करा. तुम्ही अॅप्सच्या परमिशन्सला आपल्या गरजेनुसार कॅन्सल करू शकता.

वाचाः

लोकेशन सेटिंग्सला करा चेंज
>> लोकेशन ऑन असल्याने अॅप्सला माहिती पडते की, तुमचा रियल टाइम कुठे आहे. याला ऑफ करण्यासाठीची पद्धत सुद्धा सोपी आहे.

>> यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनची मुख्य स्क्रीन ऑन करा. स्क्रीनला खालच्या बाजुला स्क्रॉल करा. लोकेशनवर लाँग टॅप करा.

>> आता जो स्क्रीन ओपन होईल त्यात तुम्ही App Permission वर टॅप करा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कोणत्या अॅपसाठी लोकेशनचा नेहमी वापर होतो. आता यावर क्लिक करा. लोकेशनला ऑफ करू शकता.

>> तसेच काही अॅप्सही असतील ज्याचा वापर होतो. त्यावेळी लोकेशनचा वापर करीत आहेत. यावेळी तुम्ही लोकेशनला ऑफ करू शकता.

>> यानंतर पुन्हा बॅकला जा. या ठिकाणी खालच्या बाजुला Location Services च्या अंतर्गत Google Locations History दिसेल. यावर टॅप करा.

>> पुन्हा तुम्हाला जीमेल अकाउंट सिलेक्ट करावे लागेल. यात तुम्ही आपले अकाउंट सिलेक्ट करा.

>> या ठिकाणी लोकेशन हिस्ट्रीला डिलीट करु शकता. याचाच अर्थ गुगल आता तुमचे लोकेशन सेव्ह करु शकत नाही. आता तुम्ही कुठेही जाल. त्याची माहिती गुगलला लागणार नाही.

>> ज्यावेळी तुम्ही याला ऑफ कराल त्यावेळी एक पॉप अप येईल. ज्यात तुम्हाला लोकेशन ऑफ करण्यासंबंधी नुकसानची माहिती सांगितली जाईल. याला व्यवस्थित वाचून अॅग्रीवर टॅप करा.

>> जर तुम्ही डिव्हाइसची लोकेशन हिस्ट्री डिलीट करु इच्छित असाल तर लोकेशन हिस्ट्री अंतर्गत Delete Location History वर टॅप करावे लागेल. प्रत्येक गुगल अकाउंटची हिस्ट्री वेगवेगळी डिलीट करावी लागेल.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here