वाचाः
व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीचा जबरदस्त फायदा सिग्नलला झाला आहे. अॅपल अॅप स्टोरवर सिग्नलने व्हॉट्सअॅपला मागे टाकून टॉप पोझिशन पटकावले आहे. सिग्नलने ही किमया केवळ ४८ तासांत साधली आहे. यावरून अंदाज बांधला जावू शकतो की, व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीला किती विरोध होत आहे.
वाचाः
‘Ad Free आहे Signal’
सिग्नलचा दावा आहे की, त्यांचे प्लॅटफॉर्म अॅड फ्री असून प्रायव्हसी जपण्यात अव्वल आहे. डाउनलोड मध्ये Signal Free Apps कॅटेगरीत वर नंबर वनच्या स्थानावर पोहोचले आहे. तर Google Play Store वर चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. प्ले स्टोरवर सिग्नलला डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. लवकरच या ठिकाणी सुद्धा ते टॉप स्थानावर पोहोचेल असे मानले जात आहे.
वाचाः
व्हॉट्सअॅपचे प्रकरण काय आहे
सिग्नलला या पोझिशनवर पोहोचण्याचे श्रेय Brian Acton ला जाते. जे Whatapp चे को-फाउंडर होते. नंतर व्हॉट्सअॅपला विकले. फेसबुकने याला खरेदी केले. आता व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना सांगतेय की, त्यांचा डेटा फेसबुकसोबत शेयर करणार आहे. यासाठी त्यांना टर्म अँड कंडिशन्सला अॅक्सेप्ट करावे लागेल. व्हॉट्सअॅपच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये राग उफाळून आला आहे. सध्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामची सुद्धा खूप चर्चा आहे. दरम्यान, टेलिग्रामच्या तुलनेत सिग्नलकडे जास्त लोक आकर्षित होत आहेत. कारण, यात व्हॉट्सअॅपप्रमाणे मेसेजिंग, व्हाइस, आणि व्हिडिओ कॉलिंग सोबत स्टिकर्स सारखे फीचर्स आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times