वाचाः
आता रेडमी Redmi K40 लाँच संबंधी खास माहिती रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंग यांनी शेयर केली आहे. त्यांनी चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबो वर ब्रँडची आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीजच्या खास फीचर्सची माहिती उघड केली आहे.
वाचाः
विबिंगच्या माहितीनुसार, रेडमी के ४० सीरीजला अधिकृत पणे फेब्रुवारीत लाँच करण्यात येणार आहे. टीजरमध्ये सीरीजचा उल्लेख आहे. त्यामुळे कंपनी रेडमी के ४० आणि रेडमी के ४० प्रो लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कंपनीकडून रेडमी के ३० चे अनेक व्हेरियंट्स लाँच केले होते. यात रेडमी के ३० प्रो झूम एडिशनचा समावेश होता. यात वेगवेगळा कॅमेरा सेटअप दिला होता. या सीरीजमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा उल्लेख करण्यात आला होता. केवळ प्रो व्हेरियंटमध्ये हे चिपसेट देण्याची शक्यता होती. जनरल मॅनेजर यांच्या माहितीनुसार, याची किंमत २९९९ चिनी युआन म्हणजेच ३४ हजार रुपये असणार आहे. रेडमी के ४० प्रो स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सर्वात स्वस्त हँडसेट होऊ शकतो.
वाचाः
याशिवाय, ब्रँडचे एग्जिक्युटीवह यांनी हेही सांगितले की, डिव्हाइसमध्ये सर्वात महाग फ्लॅट डिस्प्ले असणार आहे. याशिवाय 4000mAh बॅटरी दिली जाणार आहे. महाग डिस्प्लेचा अर्थ अमोलेड डिस्प्ले असतो. त्यामुळे प्रो व्हेरियंट या डिस्प्ले सोबत येवू शकतो. रेडमी के ४० सीरीजच्या सर्व हँडसेट्स १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट एलसीडी पॅनल सोबत येतील.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times