नवी दिल्लीः भारती एअरटेल कंपनी गेल्या अनेक वर्षापासून काही जबरदस्त पोस्टपेड प्लान ऑफर करते. एअरटेलचा पोस्टपेड प्लानची सुरुवातीची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होऊन १५९९ रुपयांपर्यंत आहे. एअरटेलच्या १५९९ रुपायांच्या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी बेस्ट प्रीमियम पोस्टपेड प्लान आहे. ज्यात अनलिमिटेड डेटा (५०० जीबी रोज), इंटरनॅशनल रोमिंग प्लानवर १० टक्के डिस्काउंट आणि अन्य दुसरे बेनिफिट्स मिळतात.

वाचाः

याशिवाय, भारती एअरटेलचा १५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये २४९ रुपये किंमतीचा एक अॅड ऑन कनेक्शन मिळतो. हा प्लान ७४९ रुपये आणि ९९९ रुपयांचा एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लानचा भाग नाही. भारती एअरटेलच्या १५९९ रुपयांच्या प्लानसंबंधी जाणून घ्या सविस्तर…

वाचाः

एअरटेलचा १५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
एअरटेलचा १५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये देशभरात प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. याशिवाय, १०० एसएमएस रोज पाठवण्याची सुविधा मिळते. या प्लानमध्ये २०० जीबी रोलओवर डेटा सोबत ५०० जीबी डेटा प्रत्येक महिन्याला मिळते. ५०० जीबी डेटा संपल्यानंतर २ पैसे प्रति एमबी या प्रमाणे पैसे मोजावे लागतात. या बेसिक बेनिफिट्स शिवाय, युजर्सला प्रत्येक महिन्याला 200ISD मिनट्स मिळतात. याशिवाय, इंटरनॅशनल रोमिंग वर १० टक्के डिस्काउंट ऑफर केले जातात.

वाचाः

एअरटेलच्या इंटरनॅशनल रोमिंग पोस्टपेड प्लानची किंमत ४९९ रुपयांपासून सुरू होते. तसेच १५९९ रुपयांचा प्लानमध्ये इन आयआर पॅक वर १० टक्के सूट मिळते. भारती एअरटेल या प्लानमध्ये दुसरे एअरटेल थँक्स रिवॉर्ड्स सारखे एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप, हँडसेट प्रोटेक्शन, शॉ अकादमी लाइफटाइम अॅक्सिस, एअरटेल एक्सट्रीम अॅप मेंबरशीप, विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन आणि जगरनॉट बुक मेंबरशीप यासारखी सुविधा मिळते.

वाचाः

टेलिकॉम कंपनीच्या माहितीनुसार, या बेनिफिट्स शिवाय अॅड ऑन रेग्युलर कनेक्शनसाठी २४९ रुपये रिचार्ज केले जातील. या कनेक्शनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १० जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज आणि केवळ डेटा सिम कनेक्शन साठी ९९ रुपये द्यावे लागतील. म्हणजेच १५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दोन पोस्टपेड कनेक्शन मिळतील.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here