नवी दिल्लीः शाओमीने मंगळवारी सांगितले की, कंपनीने पहिल्या सेलमध्ये २०० कोटीहून जास्त किंमतीच्या स्मार्टफोनची विक्री केली आहे. Mi 10i स्मार्टफोनचा पहिला सेल ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी आयोजित करण्यात आला होता तर ८ जानेवारी पासून mi.com, मी होम्स आणि मी स्टूडियोज वर उपलब्ध करण्यात आले होते.

वाचाः

शाओमीने हेही सांगितले की, अॅमेझॉन इंडियावर लाँचच्या नोटिफिकेशनसाठी १५ लाखांहून जास्त युजर्संनी रजिस्ट्रेशन केले होते. शाओमी मी १० आय ला देशात २० हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर याच्या टॉप अँड मॉडलची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

मी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी सांगितले, Mi 10i साठी चाहत्यांनी आणि ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. पहिल्या सेलमध्ये २०० कोटी रुपयांची विक्री ही एक मोठे यश आहे. त्यामुळे या ठिकाणी ही माहिती देताना मला आनंद होत आहे. मी ब्रँडचा उद्देश आहे की, चाहत्यांसाठी लेटेस्ट आणि बेस्ट टेक्नोलॉजी आणणे होय. त्यांनी पुढे म्हटले की Mi 10i या दशकातील सर्वात पहिला फोन आहे. ज्यात 108MP कॅमेरा आणि 5G टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

Mi 10iचे फीचर्स
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. सुरक्षेसाठी बॅक व फ्रंटला कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ७५० जी प्रोसेसर दिला आहे. फोनला ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी यात 4820mAh बॅरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. क्वॉड रियर कॅमेऱ्यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here