नवी दिल्लीः क्वॉलकॉमने नुकतीच ५ जी सपोर्टचा स्नॅपड्रॅगन ४८० मोबाइल प्लॅटफॉर्मवरून पडदा हटवला होता. त्यामुळे पहिल्यांदा चिपसेट कंपनीने आपली ४ सीरीज प्रोसेसरमध्ये ५जी सपोर्ट दिला आहे. सध्या हे प्रोसेसर लो एन्ड आणि बजेट फोन्ससाठी उपलब्ध आहे. आता विवो पहिला ब्रँड बनला आहे. ज्यात लेटेस्ट क्वॉलकॉम चिपसेट सोबत फोन लाँच केला आहे. ला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. भारतासह अन्य बाजारात या फोनला लाँच करणार की नाही, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

वाचाः

Vivo Y31s फोनमध्ये ६.५८ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूनश सपोर्ट करते. डिस्प्लेचा रेट ९० हर्ट्ज आणि स्क्रीन टू बॉडी स्क्रीन रेशियो ९०.६१ टक्के आहे. फोनच्या पुढच्या बाजुला एक ड्यूड्रॉप नॉच दिली आहे. विवोच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश दिला आहे. विवोच्या या फोनमध्ये लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर दिला आहे. यात ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे.

वाचाः

5G चिपसेट
५जी सपोर्ट शिवाय क्वॉलकॉमच्या या लेटेस्ट प्रोसेसर मध्ये अनेक अपग्रेड करण्यात आले आहेत. चिपसेटमध्ये वाय फाय ६ फीचर सोबत ड्यूल वाय फाय एंटीना, ब्लूटूथ आणि अडवान्स्ड वायरलेस ऑडियो सपोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here