नवी दिल्लीः टेलिग्रामने बुधवारी सांगितले की, मेसेजिंग अॅपमध्ये गेल्या ७२ तासात अडीच कोटी नवीन युजर्स जोडले गेले आहेत. कंपनीने हे युजर्स जगभरातून जोडले आहेत. परंतु, सर्वात जास्त ३८ टक्के युजर्स हे आशियातील आहेत. तर २७ टक्के युजर्स हे युरोपमधील आहेत. २१ टक्के युजर्स हे लॅटिन अमेरिकातील तर ८ टक्के युजर्स हे MENA तून आले आहेत. यासोबत टेलिग्रामने एकूण ५०० मिलियन अॅक्टिव युजर्संचा आकडा सुद्धा पार केला आहे.

वाचाः

नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसी आणल्यानंतर सिग्नल प्रमाणे टेलिग्रामचे डाउनलोड प्रमाण प्रचंड वाढले आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीनंतर युजर्सच्या डेटावरून चिंता व्यक्त केली जात आहे. युजर्स अन्य मेसेजिंग अॅपवर जात आहेत. जे जास्त सुरक्षित आहेत. एलन मस्क यांनीही फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपला मायग्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.

वाचाः

Sensor Tower च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीत बदल केल्यानंतर भारतातील सिग्नल आणि टेलिग्रामची संख्या ४० लाखांपर्यंत वाढली आहे. सिग्नलने या स्पर्धेत बाजी मारली आहे. ६ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत २.३ मिलियन नवीन डाउनलोड सोबत टॉप स्पॉट मिळवले आहे. तर टेलिग्रामने या दरम्यान १.५ मिलियन नवीन डाउनलोड मिळवले आहेत.

वाचाः

नवीन युजर्संची संख्या पाहता टेलिग्रामचे पॉवेल डुरॉव यांनी सांगितले की, लोक आपली प्रायव्हसी बदलत असल्याने फ्री सर्विस घेत नाहीत. त्यांना प्रायव्हसी हवी आहे. त्यामुळे रोज १.५ मिलियन युजर्स साइन अप करीत आहेत. आम्ही आधीही ७ वर्षा दरम्यान युजर्सची प्रायव्हसीची सुरक्षा करताना डाउनलोडची संख्या वाढवली होती. पॉवेलने सांगितले की, ५०० मिलियन अॅक्टिव युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टेलिग्राम प्रायव्हसी आणि सिक्योरिटी साठी कटिबद्ध असलेला सर्वात मोठा कम्यूनिकेशन प्लॅटफॉर्म टेलिग्राम बनले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here