मुंबईः अॅमेझॉनने आज ८९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या स्वस्त किंमतीमध्‍ये मोबाइल-ओन्‍ली प्‍लान ‘प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन’ लाँ केला. भारत हा ग्राहकांना मोबाइल-ओन्‍ली प्राइम व्हिडिओ प्‍लान देणारा जगातील पहिला अॅमेझॉन प्राइम देश बनला आहे.

वाचाः

भारतातील प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन लाँच केले असून प्री-पेड पॅक्‍स असलेले सर्व एअरटेल ग्राहक त्‍यांच्‍या मोबाइल क्रमांकाचा वापर करत एअरटेल थँक्‍स अॅपमधून अॅमेझॉनमध्‍ये साइन इन करत ३० दिवस मोफत ट्रायलचा लाभ घेऊ शकतात. ३० दिवसांच्‍या मोफत ट्रायलनंतर एअरटेल ग्राहक ६ जीबी डेटासह २८ दिवसांचे प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन मिळवण्‍यासाठी ८९ रूपयांपासून सुरू होणा-या सुरूवातीच्‍या ऑफरमध्‍ये प्री-पेड रिचार्जच्‍या माध्‍यमातून प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा आनंद घेणे सुरू ठेवू शकतात किंवा २८ दिवस वैधता असलेल्‍या २९९ रूपयांच्‍या पॅकची निवड करू शकतात. या पॅकमध्‍ये रोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा समावेश आहे.

वाचाः

प्राइम व्हिडिओ मल्‍टी-युजर अॅक्‍सेस, स्‍मार्ट टीव्‍हीसोबत इतर डिवाईसेसमध्‍ये स्ट्रिमिंग आणि एचडी/यूएचडीमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद, जाहिरात-मुक्‍त संगीत सारखे इतर प्राइम लाभ, Amazon.in वर मोफत वेगाने शिपिंग यांचा लाभ घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांना १३१ रूपयांमध्‍ये ३० दिवसांच्‍या अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वासह रिचार्जचा पर्याय असेल किंवा २८ दिवस वैधता असलेल्‍या ३४९ रूपयांच्‍या पॅकसह रिचार्ज करण्‍याचा पर्याय असेल. या पॅकमध्‍ये रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वाचा समावेश असणार आहे.

वाचाः

अॅमेझॉनसाठी हा उपक्रम ग्राहकांना अधिकाधिक सुविधा (प्‍लान्‍सच्‍या) देण्‍यासोबत मोबाइल डेटा प्‍लान्‍ससह प्राइम व्हिडिओ सुलभपणे सबस्‍क्राइब करण्‍याची सुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. आम्‍हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनसाठी भारतातील आमचा पहिला भागीदार म्‍हणून एअरटेलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक व देशातील महा-व्‍यवस्‍थापक गौरव गांधी यांनी सांगितले.

वाचाः

काय-काय मिळणार पाहा.
>> ८९ रूपयांचा रिचार्ज: २८ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि ६ जीबी डेटा.
>> २९९ रूपयांचे प्री-पेड बंडल: २८ दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १.५ जीबी
>> १३१ रूपयांचा रिचार्ज: ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, तसेच फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अमर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत
>> ३४९ रूपयांचा रिचार्ज: २८ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत, तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डेटा.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here