नवी दिल्लीः भारतीय युजर्संना ऑनलाइन बँकिंगची बऱ्यापैकी सवय झाल्याचे दिसत आहे. करोना काळात याचा वापर वाढला आहे. परंतु, बँकिंग फ्रॉडच्या घटनेत सुद्धा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल युग सुरू झाले असले तरी त्याचा धोका सुद्धा कैक पटीने वाढल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. रोखण्यासाठी लोकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी करण्यासाठी गुन्हेगारी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने एक अलर्ट जारी करून लोकांना महत्त्वाची सूचना केली आहे.

वाचाः

गेल्या काही वर्षापासून बँकिंग गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लोकांना जागृत करण्यासाठी सायबर गुन्हेगारांसंदर्भात माहिती देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, अद्याप गुन्हेगारी बंद झालेली नाही. सायबर क्रिमनल वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत. यातील एक नवीन ब्रँड पद्धत म्हणजेच सायबर क्रिमिनल्स लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने एक नवीन माहिती शेयर केली आहे.

वाचाः

सरकारचे एक ट्विटर हँडल ज्याचे वनाव सायबर दोस्त आहे. याद्वारे लोकांना सूचित करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक नवीन सूचना केली आहे. कोणीही कोणतीही चूक करू नये. तसेच मेसेजमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नये, असे गृह मंत्रालयाने सूचित केले आहे.

या अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स तुमची सर्व माहिती चोरू शकतात. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हजारदा विचार करावा, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सायबर दोस्त ने एक ट्विट केले असून त्यात ही माहिती दिली आहे. जर तुम्हाला कोणताही मेसेज मिळाला तर त्यावर लगेच क्लिक करू नका.

वाचाः

हॅकर्स युजर्संना अनेक पद्धतीचे मेसेज पाठवत असतात. यात युजर्संना वॉर्निंग देऊन भटकावण्यचा प्रयत्न करीत असतात. या मेसेजेसमध्ये लिंक दिलेली असते. ज्यवर चुकूनही क्लिक केले तर तुमची माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचत असते. त्यामुळे लक्षात ठेवावे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज कुणी पाठवला, कशासाठी पाठवला, त्याचा उद्देश काय आहे, याची सर्व पडताळणी केल्यानंतर ती लिंक ओपन करावी, असे गृह मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here