नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर २० जानेवारी पासून ला सुरूवात होणार आहे. २०२१ मध्ये आयोजित होणारी ही फ्लिपकार्टवरील पहिली मोठी सेल आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अतंर्गत सर्व प्रोडक्ट्सवर एचडीएफसी बँक कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे.

वाचाः

फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला सेलचे अॅक्सेस १९ जानेवारी पासून रात्री १२ पासून मिळणार आहे. फ्लिपकार्टने आपल्या साइटवर काही ऑफर्स आणि डिस्काउंटचा खुलासा केला आहे. स्मार्टफोन्सवर बिग सेविंग डेज सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स मिळणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग, आसुस, मोटो फोन्सवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर्स संबंधी नुकतीच माहिती देण्यात आली होती. आता फ्लिपकार्टवर काही ऑफर्सचा खुलासा करण्यात आला आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी एफ४१ स्मार्टफोनला या सेलमध्ये १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तर गॅलेक्सी ए २१ एस स्मार्टफोनला १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

गॅलेक्सी ए३१ आणि गॅलेक्सी ए ७१ ला अनुक्रमे १६ हजार ९९९ रुपये आणि २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

सॅमसंगच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन्स गॅलेक्सी नोट १० प्लस आणि गॅलेक्सी एस २० प्लस ला ४९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

अॅपल आयफोनला सुद्धा या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. आयफोन एसईला २७ हजार ९९९ रुयपात तर आयफोन एक्सआर ला ३५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

पोको एक्स ३ स्मार्टफोनला या सेलमध्ये १४ हजार ९९९ रुपयात, पोको एम२ प्रोला ११ हजार ९९९ रुपयात तर पोको सी ३ ला ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

मोटो जी ५जी ला या सेलमध्ये १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

आसुस रोग ३ ला ४३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. LG G8X ला २५ हजार ९९० रुपयांत तर iQOO 3 5G ला ३४ हजार ९९० रुपयात फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here