वाचाः
एकदा स्टेट्स लावल्यानंतर हे २४ तासांसाठी दिसते. त्यानंतर ते आपोआप बाद होते. व्हॉट्सअॅपच्या या फीचरला कोणी-कोणी पाहिले हे त्या युजर्संला सीनमध्ये दिसते. परंतु, आम्ही तुम्हाला याच्या उलट माहिती देणार आहोत. जर तुम्ही एखाद्याचे व्हॉट्सअॅप पाहिले तरी त्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. जर तुम्ही कुणाचे व्हॉट्सअॅपचे स्टेट्स पाहिल्यास तुमचे नाव सीन मध्ये दिसणार नाही. या पद्धतीने तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोणत्याही युजरचा लपून छपून स्टेट्स पाहू शकतात. तसेच त्या व्यक्तीला माहिती पडू सुद्धा शकणार नाही.
वाचाः
सर्वात आधी अँड्रॉयड किंवा आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर अकाउंटला ओपन करा. आता प्रायव्हसी वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रीड रिसिप्टचे एक ऑप्शन दिसेल. आता या ऑप्शनला डिसेबल करा.
वाचाः
या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये ब्लू टिकचे ऑप्शन बंद होईल. या ऑप्शन बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज आला असेल तर तुम्हाला माहिती होईल परंतु, तुम्ही तो मेसेज वाचला की नाही, हे समोरच्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. याचाच अर्थ तुम्ही कुणाचेही मेसेज वाचू शकता पण त्याला कळणार नाही की, तुम्ही त्याचे मेसेज वाचले की नाही. याच पद्धतीने या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर युजर्सचे स्टेट्स पाहिल्यानंतर त्यांना समजणार नाही की, तुम्ही त्यांचे स्टेट्स पाहिले की नाही. तसेच तुमचे नाव सुद्धा सीन लिस्टमध्ये दिसणार नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times