नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने भारतीय मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतीय बाजारात चीनी कंपनीने नवीन रेनो ५ प्रो ५ जी सोबत देशात मिड रेंज ५ जी मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आहे. भारतात ५जी सेल्युलर कनेक्टिविटी यावर्षी अखेरपर्यंत येऊ शकते. त्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतात वेगाने ५जी स्मार्टफोन लाँच करीत आहेत.

वाचाः

Oppo Reno 5 Pro 5G ला चीनमध्ये गेल्या वर्षी मोठ्या स्तरावर लाँच केले होते. या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मीडियाटेक Dimensity 1000+ प्रोसेसर दिला आहे. 5G च्या आत मध्ये Dimensity 1000+ प्रोसेसर दिला आहे. त्यामुळे जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ क्लिक करता येऊ शकतात.

वाचाः

Oppo Reno 5 Pro 5G मध्ये ६.५ इंचाचा 1080p AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. या स्मार्टफोनवर एक पंच होल डिस्प्ले दिला आहे. तसेच इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी रॅम दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड ColorOS 11 वर काम करतो.

वाचाः

या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4350mAh ची बॅटरी दिली आहे. 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट करते. ३२० डिग्री सराउंड एन्टिना दिला आहे. या सोबत इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येऊ शकतो. या फोनवर केवळ ११ सेकंदात १ जीबी पर्यंत मूव्हीला रेकॉर्ड केले जाऊ शकते. Oppo Reno 5 Pro 5G ची सुरुवातीची किंमत ३५ हजार ९९० रुपये आहे. या स्मार्टफोनची भारतात २२ जानेवारी २०२१ पासून विक्री सुरू होणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here