नवी दिल्लीः सोशल मीडियाचा वापर सध्या अनेक जण आवर्जून करीत आहेत. फेसबुक पासून ट्विटर पर्यंत सर्वच जण या प्लॅटफॉर्मचा वापर अनेक कामांसाठी केला आहे. यातील एक कारण म्हणजे प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू देणे होय. अनेकदा आपण प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू देण्यासाठी या प्लॅटफॉर्म्सचा वापर करत असतो. जर तुम्ही या पैकी एक असाल तर हा अलर्ट तुमच्यासाठी आहे. खराब प्रोडक्ट किंवा कोणत्याही सर्विस संबंधी सार्वजनिक मंचावर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लिहिणाऱ्या व्यक्तींना हा इशारा देण्यात आला आहे.

वाचाः

ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर आपली तक्रार पोस्ट करून व्यक्ती फ्रॉडस्टर्सला आकर्षित करतात. हे स्कॅमर्स युजर्संला कस्टमर केयर एग्जिक्यूटी असल्याचे सांगून कॉल करतात. त्यांना खासगी माहिती मागवतात. यावरून केवळ ते युजर्संचा मोबाइल नंबर आणि ईमेल अॅड्रेसची माहिती मिळवतात. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करीत असतात. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने ट्विटरवर याची माहिती दिली आहे.

वाचाः

या पोस्टमध्ये सायबर क्राईम डीसीपी यांनी ट्विटर वर पोस्ट लिहिली असून युजर्संना हा इशारा दिला आहे. जर तुम्ही वॉलेट, बँक अॅप्स, एअरलाइन्स आदी मुद्द्यावर आपली तक्रार ट्विटरवर पोस्ट करीत असाल तर हे फ्रॉडस्टर्सला आकर्षित करतात. यासंबंधी राज्य पोलिसांनी सांगितले की, युजर्स या स्कॅमपासून वाचू शकतात. तक्रार करायची असल्यास युजर्संनी ईमेल आयडीचा वापर करायला हवा. ज्यावेळी तुम्ही केयर सर्विस नंबर वर कॉल करून आपली तक्रार करू शकता. या पोस्टमध्ये हाही इशारा दिला आहे की, युजरच्या आर्थिक क्रिडेंशियल्स ला रिफंड करण्यास सांगितले जात नाही. तसेच युजर्संना त्यांचा एटीएम पिन किंवा पासवर्ड शेयर करण्यास सांगितले जात नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here