वाचाः
ई-कॉमर्स वेबसाइट्स Amazon आणि Flipkart ने आपल्या वेबसाइट्सवर पहिल्या वर्षाच्या सेलची घोषणा केली आहे. दोन्ही वेबसाइट्सवर २० जानेवारी पासून सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्याने अनेक डिल्स व डिस्काउंट दिले जाणार आहे. त्यामुळे या सेलला जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला सुद्धा शॉपिंक करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. हॅकर्स कधीही आपल्यावर हल्ला करू शकतात. ज्यावेळी आपण ऑनलाइन शॉपिग करीत असतो त्यावेळी हॅकर्सची आपल्यावर नजर असते. ऑनलाइन शॉपिंग करताने या टिप्सचा अवलंब केला तर आपण हॅकर्सपासून सावध राहू शकतो. जाणून घ्या.
वाचाः
ऑनलाइन शॉपिंक करताना या गोष्टी ध्यानात ठेवा
>> नेहमी कोणत्याही विश्वसनीय आणि प्रतिष्ठित वेबसाइट्सवरून शॉपिंग पेमेंट्स करा.
>> ई-मेल मध्ये देण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. नेहमी ब्राउजरमध्ये यूआरएल टाइप करुन चेक करा.
>> ज्यावेळी तुम्ही कोणत्याही वेबसाइटवरून आपली खासगी माहिती भरता. त्यावेळी त्या वेबसाइटची यूआरएल चांगली तपासून पाहा.
>> जर तुम्ही लागोपाठ ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर Verify by Visa आणि Visa आणि Master Card सिक्योर कोड प्रोग्राम साठी साइन अप करा.
>> लागोपाठ आपल्या अकाउंटवरून स्टेटमेंटला चेक करत राहा. जर कोणतीही गडबड दिसली तर रिपोर्ट करा.
>> कोणतीही पेमेंट आधी वेबपेजवर पॅड लॉक साइनचे ध्यान ठेवा.
>> ऑनलाइन शॉपिंग साइटवर जाण्यासाठी ईमेल किंवा रेफरल वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करा.
>> अॅड्रेस बार नेहमी यूआरएल टाइप करा.
>> आपली कोणतीही खासगी व गोपनीय माहिती जसे, क्रेडिट कार्ड्स नंबर्स, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही नंबर्स आदीला पॉप अप विंडोत टाकू नका.
>> कोणत्याही ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपी सर्वात बेस्ट आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे पेमेंट साठी ओटीपीचा वापर करा.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times