नवी दिल्लीः मध्ये मोबाइल्स, टीव्ही स्मार्टवॉच, फिटनेस ब्रँडसह अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स देण्याची घोषणा शाओमीने केली आहे. Flipkart Big Saving Day Sale आणि Amazon Great Republic Day Sale सोबत आता चीनची कंपनी शाओमीने २० जानेवारीपासून Xiaomi Republic Day Sale सुरू केला आहे. हा सेल २४ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाः

शाओमी रिपब्लिक डे सेलमध्ये Mi आणि Redmi च्या खूप साऱ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहे. यात Redmi Note 9 series, Redmi 9 Prime,Redmi 9i Redmi Smart Band, Mi Smart Band 4, Mi Watch Revolve, Redmi Earbuds S, Mi Smart Water Purifier, Mi TV Stick, Mi LED Smart TVs आणि Mi True Wireless Earphones 2C सह अन्या प्रोडक्ट्स कमी किंमतीत मिळत आहे.

वाचाः

रेडमीच्या या फोनवर बंपर ऑफर
Xiaomi Republic Day Sale मध्ये डिस्काउंट आणि ऑफर्स नंतर Redmi 9i च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये, Redmi 9 Prime च्या 4GB RAM + 64GB वेरियंट ची किंमत ९ हजार ४९९ रुपये, Redmi Note 9 च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंट ची किंमत १ हजार डिस्काउंटनंतर १३ हजार ९९९ रुपये, Redmi Note 9 Pro चे 4GB + 128GB वेरियंट २ हजार सूटनंतर १३ हजार ९९९ रुपये आणि Redmi Note 9 Pro Max चे 6GB + 64GB स्टोरेज वेरियंट १ हजार सूटनंतर १७ हजार ४९९ रुपयांत मिळत आहे.

वाचाः

स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडवर ऑफर
Amazon आणि Flipkart वर सुरू असलेल्या शाओमी साइट आणि स्टोरवर सुरू असलेल्या Xiaomi Republic Day Sale मध्ये Mi Smart Band 4 वर ४०० रुपयांची सूट मिळत आहे. यानंतर याची किंमत १८९९ रुपये झाली आहे. Mi Watch Revolve वर २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याची किंमत ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. Redmi Smart Band ची किंमत डिस्काउंट नंतर १२९९ रुपये झाली आहे.

वाचाः

ईयरबड्स आणि ट्रिमरवर इतकी सूट
शाओमीच्या या सेलमध्ये Mi True Wireless Earphones 2C 1,999 रुपये आणि Mi True Wireless Earphones 2 २४९९ रुपयांत खरेदी करू शकता. Mi Beard Trimmer 1C ची किंमत ७९९ रुपये आणि Redmi Earbuds S ची किंमत ३०० रुपयांच्या सूटनंतर १४९९ रुपये झाली आहे.

वाचाः

Mi TV वर इतका डिस्काउंट
मध्ये Mi LED Smart TV वर १०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकते. या सेल दरम्यान Mi LED TV 4A Pro 32 इंचाचा टीव्ही ५०० रुपयांच्या सूटनंतर १४ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. तर Mi LED TV 4A Pro 43 इंचाच्या मॉडलवर १ हजारांची सूट दिली जाते. यानंतर याची किंमत २३ हजार ९९९ रुपये झाली आहे. Mi LED TV 4X 50 इंचाच्या मॉडलची किंमत १ हजारांच्या सूटनंतर ३३ हजार ९९९ रुपये झाली आहे. Mi LED TV 4X 55 इंचाच्या १ हजार रुपयांच्या सूटनंतर ३८ हजार ९९९ रुपये झाली आहे. Mi TV Stick आणि Mi Box 4K वर मोठी सूट दिली जाणार आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here