वाचाः
Tata Sky च्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या स्टेप्स समजून घ्याव्या लागतील. तसेच आपली संपूर्ण माहिती भरावी लागेल. यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्सवर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्यावे लागतील. यानंतर दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमच्या मित्र मंडळीचे नाव म्हणजेच ज्याला तुम्ही रेफर करू इच्छिता त्यांचे नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि ई-मेल आयडी द्यावा लागेल.
वाचाः
तुम्ही तुमच्या मित्र मंडळीचे (Whatsapp), जीमेल (Gmail), फेसबुक (Facebook), लिंकडिन (Linkdin) यासारख्या अनेक मीडिया द्वारे टाटाच्या या स्कीमला रेफर करू शकता. याशिवाय Tata Sky HD सेट-टॉप बॉक्स आता कंपनीच्या अधिकृत साइटवर १४९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. Tata Sky देशातील सर्वात मोठी DTH सर्विस प्रोवाइडर कंपनी आहे. टाटा स्कायने भारतात न्यू कॉन्टेस्ट लाँच केले आहे. याला टाटा स्काय रिाचार्ज केल्यानंतर कार जिंका कॉन्टेस्ट नावाने सुरू करण्यात आले होते. या स्पर्धेत ३० विजेत्यांना टियागो कार दिली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ४.७० लाख रुपये आहे.
वाचाः
ही स्पर्धा ८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याासाठी युजर्संना आपल्या टाटा स्काय अकाउंटला रिचार्ज करावे लागणार आहे. रिचार्ज पूर्ण केल्यनंतर काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. त्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. त्यातील विजेत्याला कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात युजर्संना ५०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज करावे लागणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times