नवी दिल्लीः स्मार्टफोन आता ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये भारतात लाँच करण्यात आले आहे. याआधी रियलमीच्या Realme C12 फोनला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनला गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. या फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत लाँच करण्यात आले होते.

वाचाः

Realme C12 च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे. या फोनला ब्लू आणि पॉवर सिल्वर कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करता येऊ शकते. या फोनची ऑनलाइन स्टोरवर विक्री सुरू झाली आहे. या फोनला पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर कलरमध्ये खरेदी करता येऊ शकते.

वाचाः

Realme C12 स्मार्टफोनला ड्यूल सिम सपोर्ट सोबत अँड्रॉयड १० आधारित रियलमी यूआय शिवाय या फोनमध्ये ६.५ इंचाचा मिनी ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. यात गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेकचे ऑक्टाकोर हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. याशिवाय यात ३ जीबी पर्यंत रॅम दिली आहे.

वाचाः

या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात मेन कॅमेरा १३ मेगापिक्सलचा, दुसरा २ मेगापिक्सलचा आणि तिसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here