मुंबईः एअरटेल युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. भारतात डिजिटल पेमेंट, डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी एअरटेलने आता नावाची सर्विस सुरू केली आहे. ही सेवा प्रसिद्ध टेलिकॉम नेटवर्क एअरटेलच्या ऑनलाइन बँकिंग सिस्टम Payments Bank च्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. तसेच एअरटेलने दावा केला आहे की, यावरून युजर नेट बँकिंग आणि Unified Payments Interface (UPI) ट्रान्झॅक्शन विना कोणतेही फ्रॉड किंवा चोरीपासून सुरक्षित राहता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

वाचाः

इंडिया-फर्स्ट इनोव्हेशन, ‘एअरटेल सेफ पे’ हे एअरटेलच्या ‘टेलको एक्स्क्लुझिव्ह’ नेटवर्क बुद्धिमत्तेचे लाभ देते. हे फिशिंग, चोरीची क्रेडेन्शियल्स किंवा संकेतशब्द आणि अगदी नकळत ग्राहकांना पकडणारे फोन क्लोनिंग यासारख्या संभाव्य फसवणूकीपासून उच्च पातळीचे संरक्षण प्रदान करते. एअरटेल सेफ पे’ वापरुन एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहक सुरक्षित डिजिटल पेमेंट करू शकतात आणि लाखो व्यापारी, ऑनलाइन किरकोळ विक्रेते आणि सुविधांना पैसे पाठवू शकतात. ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत खाते उघडू शकतात. त्यानंतर ते पूर्णपणे सुरक्षित डिजिटल पेमेंटच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.

वाचाः

असा करा वापर
Airtel Safe Pay ला Airtel Payments Bank च्या आत जाऊन सुरू करू शकते. यासाठी सर्वात आधी एअरटेल आपल्या मोबाइलवर एअरटेल थँक्स अॅप उघडा. यानंतर स्क्रीवर खाली दिसत असलेल्या Payments Bank ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर अॅड करण्यात आलेल्या अकाउंटच्या सेफ पे स्टेट डिअॅक्टिवेटेड दिसेल. अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Enable Safe Pay चे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग आणि यूपीआय पेमेंट्स सोपी होऊ शकते. ज्यावेळी तुम्ही ट्रान्झॅक्शन कराल त्यावेळी तुम्हाला अलर्ट मेसेज येईल. तुमच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण होऊ शकणार नाही. ही सेवा एअरटेल युजर्संसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here