नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Days सेल सुरू झाला आहे. हा सेल २४ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये बजेट फोन पासून फ्लॅगशीप स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकते. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये डिल्स आणि डिस्काउंटची खास माहिती देण्यात येत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः

Apple iPhone 11
या फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटवर १० टक्के म्हणजेच ५ हजार ९०१ रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सोबत ४८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. याची किंमत ५४ हजार ९०० रुपये आहे. तसेच यासोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जाऊ शकते.

वाचाः

Realme 7 Pro
या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात असल्याने हा फोन २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

वाचाः

Samsung Galaxy S20++
या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ४५ टक्क्यांच्या डिस्काउंट सोबत ४४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. याची खरी किंमत ८३ हजार रुपये आहे. या फोनवर ३८ हजार ००१ रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. यासोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. एकूण या फोनवर ५४ हजार ५०१ रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः

Asus ROG Phone 3
या फोनची वास्तविक किंमत ५७ हजार ९९९ रुपये आहे. यावर १७ टक्के म्हणजेच १० हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या फोनला ४७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत आहे. यासोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या फोनवर एकूण २६ हजार ५०० रुपयांपर्यंत ऑफर दिली जात आहे.

वाचाः

Realme Narzo 20 Pro
या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या फोनवर १५ टक्के म्हणजेच ३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. याची वास्तविक किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तसेच या फोनला १५ हजारापर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here