नवी दिल्लीः जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि डेबिट कार्ड वरून इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले की, डेबिट कार्डवरून जर तुम्हाला कोणत्याही अडचणीविना देवाण-घेवाण करायची असेल तर तुम्हाला बँकेत आपले पॅन कार्ड नंबर अपडेट करावे लागेल.

वाचाः

ऑनलाइन-ऑफलाइन करू शकतात पॅन कार्ड अपडेट
पॅन कार्ड नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीचे करता येऊ शकते. हे तुम्ही ऑनलाइन करू शकता. तसेच बँकेच्या शाखेत जाऊन सुद्धा तुम्हाला हे अपडेट करता येऊ शकते. गेल्या वर्षी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन नियमासंबंधी रिझर्व्ह बँकेने काही बदल केले आहेत.

वाचाः

SBI ने आपल्या ग्राहकांना केले अलर्ट
एसबीआयने सोशल मीडिया साइट ट्विटरवर ही माहिती दिली आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये काही अडचण येत आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. एसबीआय डेबिट कार्ड द्वारे कोणत्याही अडचणीविना विदेशी देवाण-घेवाण सुरू ठेवायची असेल तर बँकेत आपल्या रेकॉर्डनच्या पॅन कार्डची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे, असे बँकेने म्हटले आहे.

वाचाः

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत
१] सर्वात आधी SBI इंटरनेट बँकिंग मध्ये Log In करा, e service टॅबवर क्लिक करा.
२] या ठिकाणी PAN registration चे ऑप्शन असेल. याला क्लिक करा.
३] पासवर्ड टाका. त्यानंतर सबमिट करा. या ठिकाणी तुम्हाला अकाउंट दिसेल.
४] ज्या अकाउंटमध्ये पॅ रजिस्टर्ड नसेल. त्याच्यासमोर
click here to register मेंशन करावे लागेल.
५] तुम्ही ज्या अकाउंटमध्ये पॅन रजिस्टर करीत असाल त्यावर क्लिक करा.
६] यानंतर पुढील पेज ओपन होईल. या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाका आणि सबमिट करा.
७] यानंतर स्क्रीनवर तुमचे नाव, CIF आणि पॅन नंबर येईल. याला चेक करून कन्फर्म करा.
८] कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक हाय सिक्योरिटी पासवर्ड येईल. याला टाकून कन्फर्म करा.
९] यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. ज्यात तुमची रिक्वेस्ट सबमिशनची माहिती असेल.
१०] बँक तुमची रिक्वेस्टला ७ दिवसांच्या आत प्रोसेस पूर्ण करेल.

वाचाः

ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत
जर तुम्हाला ऑफलाइन द्वारे पॅन रजिस्टर्ड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ब्रँच मध्ये जाऊन अर्ज करू शकता. त्या ठिकाणी एक अर्ज भरू शकता. पॅन कार्डची फोटो कॉपी अटॅच करून त्याला जमा करू शकता. यानंतर तुम्हाला मोबाइलवर एक मेसेज येईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here