नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी कमी किंमतीती स्वस्त ४ जी डेटा वाउचर्स उपलब्ध केले आहेत. तसेच आपल्या युजर्संना जास्तीत जास्त बेनिफिट्स देण्यासाठी कंपनी आपल्या प्लान्सला अपडेट करत असते. कंपनीने आता नुकतेच आपल्या ११ रुपयांच्या ४ जी वाउचर सोबत मिळणारा बेनिफिटमध्ये मोठा बदल केला आहे. स्वस्त जिओ डेटा वाउचर मध्ये आता युजर्सला आधीच्या तुलनेत अधिक डेटा दिला जात आहे. हा प्लान नवीन बेनिफिट्स सोबत जिओच्या अधिकृत साइट जिओ डॉट कॉमवर अपडे केले आहे.

वाचाः

जिओचा ११ रुपयांचा वाउचर
आधी ११ रुपयांच्या या वाउचरमध्ये ४जी डेटा कंपनी आपल्या प्रीपेड युजर्संना ८०० एमबी डेटा देत होती. परंतु, आता यात बदल करण्यात आला आहे. कंपनी आता आपल्या युजर्संना १ जीबी डेटा देणार आहे. कंपनीने या प्लानच्या वैधतेत कोणताही बदल केला नाही.

वाचाः

जिओचे ४जी वाउचर्स
११ रुपयांशिवाय रिलायन्स जिओकडे २१ रुपये, ५१ रुपये, १०१ रुपयांचे स्वस्त ४ जी डेटा वाउचर्स उपलब्ध आहेत. यासोबतच प्रीपेड युजर्संना २ जीबी, ६ जीबी आणि १२ जीबी डेटा ऑफर करते. या सर्व वाउचर्सची वैधता सध्याच्या प्लान्सच्या वैधतेपर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाः

याशिवाय, जिओकडे तीन अन्य डेटा प्लान्स आहे. याची किंमत १५१ रुपये, २०१ रुपये आणि २५१ रुपये आहे. या डेटा वाउचर्समध्ये युजर्संना अनुक्रमे ३० जीबी डेटा, ४० जीबी डेटा, आणि ५० जीबी डेटा दिला जातो. परंतु, हे तिन्ही जिओ डेटा प्लानसची वैधता ३० दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here