नवी दिल्लीः बजेट मोबाइल सेगमेंटमध्ये आणखी एक जबरदस्त मोबाइल लाँच करण्यात आला आहे. Infinix ने खूपच कमी किंमतीत आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Hot 10 Play ची किंमत केवळ ६ हजार ५०० रुपये आहे. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ६.८२ इंचाचा डिस्प्ले आणि 6000mAh बॅटरीसारखे खास फीचर्स देण्यात आले आहे.

वाचाः

Infinix Hot 10 Play ला 2GB RAM + 32GB स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनला Aegean Blue आणि Morandi Green सारख्या कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G25 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या फोनला सध्या फिलिपिन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. लवकरच या फोनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. भारतात सध्या Infinix Hot 10 सारख्या फोनची बंपर विक्री होते.

वाचाः

Infinix Hot 10 Play मध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन 720×1640 पिक्सल आहे. Android 10 (Go edition) वर बेस्ड या फोनमध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर या फोनला ५३ तासांपर्यंत बोलता येऊ शकते. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये Gyroscope, Ambient Light Sensor, Proximity Sensor आणि Accelerometer सह अनेक फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here