वाचाः
१९९९ रुपयांच्या प्लानमध्ये २१ दिवसांहून जास्त वैधता
भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानची वैधता २१ दिवसांनी वाढवली आहे. रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत आता या प्लानची वैधता ३८६ दिवसांची झाली आहे. ही एक्स्ट्रा वैधता ऑफर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आहे.
१९९९ रुपयांच्या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज मिळतो. याशिवाय युजर्संना PRBT (BSNL Tunes) सब्सक्रिप्शन ३६५ दिवसांसाठी फ्री मिळते. या प्लानमध्ये इरोस नाउचे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी मिळते.
वाचाः
२३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७२ दिवसांची वैधता वाढवली
बीएनएनएलने रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ७२ दिवसांनी वाढवली आहे. आता या प्लानची वैधता ४३७ दिवसांची झाली आहे. ग्राहकांना याचा फायदा ३१ मार्चे २०२१ पर्यंत मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, १०० एसएमएस रोज, ३ जीबी डेटा रोज, आणि इरोस नाउचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.
वाचाः
३९८ रुपयांचा नवा एसटीव्ही लाँच
बीएसएनएलने ३९८ चा एसटीव्हीला काही दिवसांपूर्वी लाँच केले होते. परंतु, टेलिकॉम कंपनी आता याला रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत आणले आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मिळणारा अनलिमिटेड डेटा तसेच रोज १०० एसएमएस फ्री मिळते. रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत बीएसएनएल लिमिटेड पीरियड साठी फुल टॉक टाइम ऑफर करीत आहे. कंपनीच्या १२० रुपये, १५० रुपये, २०० रुपये, २२० रुपये, ३०० रुपये, ५०० रुपये, १ हजार रुपये, ११०० रुपये, २ हजार रुपये, ३ हजार रुपये, ५ हजार रुपये, आणि ६ हजार रुपयांच्या प्लानमध्ये फुल टॉकटाइमचा फायदा मिळू शकतो.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times