नवी दिल्लीः स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. रेडमीचा हा अपकमिंग फोन गेल्या काही आठवड्यापासून खूप चर्चेत आहे. या दरम्यान, लाँचआधीच फोनच्या रिटेल बॉक्सचा फोटो ऑनलाइन लीक झाला आहे. रिटेल बॉक्सच्या लीक फोटोमुळे रेडमी चाहत्यांची उत्सूकता आणखी वाढवली आहे.

वाचाः

फोटोत दिसले दोन रिटेल बॉक्स
लीक फोटोत दोन वेगवेगळे रिटेल बॉक्स दिसत आहेत. दोन्ही मध्ये केवळ साइज मध्ये फरक आहे. एक बॉक्स थोडा दिसायला मोठा आहे. तर दुसरा थोडा स्लिम आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, या बॉक्समध्ये स्मार्टफोन सोबत चार्जर मिळणार नाही.

वाचाः

फोनमध्ये पंच होल डिझाइनचा डिस्प्ले
अपकमिंग रेडमी के ४० सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन के ४० आणि के ४० प्रो लाँच करू शकते. फोनमध्ये पंचहोल डिझाइन सोबत अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे पंच होल कटआउट डिस्प्ले मध्ये टॉप सेंटर असणार आहे. ज्यात फ्रंट कॅमेरा असणार आहे. अफवांच्या माहितीनुसार, रेडमी के ४० सीरीजमध्ये कंपनी इंडस्ट्रीचा सर्वत महाग स्क्रीन ऑफर करणार आहे.

वाचाः

स्नॅपड्रॅगन ८८८ SoC प्रोसेसर मिळणार
या अपकमिंग स्मार्टफोनच्या प्रो व्हेरियंटमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८८८ SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर याच्या स्टँडर्ड व्हर्जन मध्ये स्नॅपड्रॅगन 775G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. रेडमी K40 प्रो ला २९९८ युआन म्हणजेच ३३ हजार ८०० रुपयांत लाँच केले जाऊ शकते. या सीरीजला कंपनी पुढील महिन्यात स्प्रिंग फेस्टिव्हल नंतर लाँच करू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here